african penguine

आफ्रिकन पेंग्विन(African Penguins) हे दक्षिण आफ्रिकेच्या किनारपट्टीवर आणि बेटांवर राहतात. त्यांचा नामशेष होण्याचा धोका जास्त असल्याने ते आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाच्या रेड लिस्टमध्ये आहेत.

    मधमाशांच्या(Honey Bee) झुंडीने केप टाऊनच्या (Cape Town Beach)बाहेर समुद्रकिनाऱ्यावर ६३ दुर्मिळ आफ्रिकन पेंग्विनला (63 African Penguins Dead)मारल्याची माहिती मिळाली आहे. मारले गेलेल्या पेंग्विनची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे अशी घटना दुर्दैवी असल्याचं दक्षिण आफ्रिकेचे फाऊंडेशन फॉर द कॉन्झर्व्हेशन ऑफ कोस्टल बर्ड्सने रविवारी सांगितलं. “चाचणी केल्यानंतर, पेंग्विनच्या डोळ्यांभोवती मधमाशांचे दंश आढळले. अशाप्रकारे मधमाशानी तब्बल ६३ पेंग्विनला मारणं ही एक अत्यंत दुर्मिळ घटना आहे, अशी माहिती फाऊंडेशनचे पशुवैद्यकीय अधिकारी डेव्हिड रॉबर्ट्स यांनी दिली.

    डेव्हिड रॉबर्ट्स म्हणाले की,“ज्या ठिकाणी मृत पेंग्विन आढळले त्या ठिकाणी मृत मधमाशाही सापडल्या. शुक्रवारी मृत आढळलेले सर्व पेंग्विन हे केप टाऊनजवळील सिमोनटाउनमधील या शहरातील आहेत. हा परिसर राष्ट्रीय उद्यान असून आणि केप मधमाशा या पर्यावरणीय व्यवस्थेचा भाग आहेत. पेंग्विन आधीच नष्ट होण्याचा धोका आहे, त्यामुळे ते अशा पद्धतीने मरायला नको. ते संरक्षित प्रजाती आहेत,” असं रॉबर्ट्स म्हणाले.

    आफ्रिकन पेंग्विन हे दक्षिण आफ्रिकेच्या किनारपट्टीवर आणि बेटांवर राहतात. त्यांचा नामशेष होण्याचा धोका जास्त असल्याने ते आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाच्या रेड लिस्टमध्ये आहेत.