vijay diwas

१६ डिसेंबर १९७१ या दिवशी भारताने पाकिस्तानला युद्धात हरवले होते. या युद्धानंतर पाकिस्तानी सैनिकांनी आत्मसमर्पण केले. त्यामुळे पूर्व पाकिस्तान स्वतंत्र झाला. याच पूर्व पाकिस्तानला आता आपण बांगलादेश या नावाने ओळखतो. या युद्धाच्या आधी काही घटना घडल्या होत्या त्याची माहिती आपण आज पाहणार आहोत.

भारताच्या इतिहासात १६ डिसेंबर हा दिवस सुवर्णाक्षराने लिहीला गेलेला दिवस आहे. हा दिवस भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाची आठवण करुन देणारा आहे.(India -pakistan war) १६ डिसेंबर १९७१(16 December 1971) या दिवशी भारताने पाकिस्तानला युद्धात हरवले होते. या युद्धानंतर पाकिस्तानी सैनिकांनी आत्मसमर्पण केले. त्यामुळे पूर्व पाकिस्तान स्वतंत्र झाला. याच पूर्व पाकिस्तानला आता आपण बांगलादेश या नावाने ओळखतो. या युद्धाच्या आधी काही घटना घडल्या होत्या त्याची माहिती आपण आज पाहणार आहोत.

या युद्धाची पार्श्वभूमी १९७१ या वर्षाच्या सुरुवातीपासून तयार झाली. पाकिस्तानचे याहिया खान यांनी २५ मार्च १९७१ ला पूर्व पाकिस्तानच्या जनभावनांना सैनिकी बळाचा वापर करुन चिरडण्याचा प्रयत्न केला होता.

यानंतर शेख मुजीब यांना अटक करण्यात आली. या घटनेनंतर पाकिस्तानातील अनेक शरणार्थी भारतात यायला लागले. जेव्हा भारतात पाकिस्तानी सैन्याच्या गैरव्यवहाराच्या बातम्या येऊ लागल्या तेव्हा भारतावर सैन्याद्वारे हस्तक्षेप करण्यासाठी दबाव येऊ लागला.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना एप्रिलमध्ये पाकिस्तानावर आक्रमण करायचे होते. त्यांनी यासंदर्भात सैन्याचे अध्यक्ष जनरल माणकेशॉ यांचा सल्ला घेतला. माणकेशॉ यांनी स्पष्ट सांगितले की, आपण संपूर्ण तयारीनिशी युद्धामध्ये उतरले पाहिजे.

त्यावेळी भारताकडे फक्त एक पर्वतीय डिव्हिजन होते. या डिव्हिजनकडे पूल बनविण्याची क्षमता नव्हती. पावसाळा सुरु झाला होता आणि अशावेळी पूर्व पाकिस्तानमध्ये प्रवेश करणे त्रासदायक ठरले असते.

यानंतर ३ डिसेंबर १९७१ रोजी इंदिरा गांधी कलकत्त्यातील एका सभेला संबोधित करत असताना पाकिस्तानी वायूसेनेच्या विमानांनी भारतीय वायूसीमा पार केली. पठाणकोट, श्रीनगर, अमृतसर, जोधपूर, आग्रा आदी सैनिकी हवाई अड्ड्यांवर बॉम्ब टाकायला सुरुवात केली.
इंदिरा गांधींनी दिल्लीला जाऊन आपत्कालीन मंत्रीमंडळ बैठक बोलवली. युद्ध सुरु झाले. भारतीय सैन्याने जेसोर आणि खुलनावर विजय मिळवला. भारतीय सैन्याने महत्वाची ठिकाणे काबीज करण्याऐवजी पुढे जात राहण्याची रणनिती अवलंबली. माणेकशॉ यांनी खुलना आणि चटगाव काबीज करायचे होते.  ढाकावर ताबा मिळवण्याचे लक्ष्य त्यांच्यासमोर नव्हते.

१४ डिसेंबरला ढाकाच्या गव्हर्नमेंट हाऊसमध्ये गुप्त बैठक होणार असल्याची माहिती भारतीय सैन्याला मिळाली. या बैठकीत पाकिस्तानी अधिकारी सहभागी होणार असल्याची माहितीही मिळाली. भारतीय सैन्याने या बैठकीच्या ठिकाणी मिग २१ विमानांच्या मदतीने बॉम्ब टाकले. त्यानंतर गव्हर्नर मलिक यांनी राजीनामा दिला.

१६ डिसेंबरला सकाळी पाकिस्तानच्या सैन्याने आत्मसमर्पण केले.