रस्त्यावर झोपणारा भिकारी बोलतो इंग्लिश; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, ‘क्या बात है!’

पाकिस्तानातील लाहोर येथे रस्त्यावरच झोपणारा एक भिकारी जेव्हा स्पष्ट इंग्रजी भाषेत बोलतो. तेव्हा अनेकांना त्याच्याकडून प्रेरणा घेण्यासारखेच आहे.

लाहोर. काही दिवसांपूर्वीच आपल्या देशातील भिकार्‍यांची एकूण संख्या, त्यांची स्थिती याविषयीचा अहवाल आला होता. त्यानुसार आपल्या देशातील बरेच भिकारी बारावी उत्तीर्ण असल्याचे सत्य समोर आले होते. पाकिस्तानसारख्या देशात एक भिकारी असा आहे जो रस्त्यावर झोपतो. पण, त्याच्या तोंडून इंग्रजी ऐकून भल्याभल्यांनी तोंडात बोटे घातली आहेत.

आज जगभरात इंग्रजी ही भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते. तसेही जगभरात इंग्रजीला बरेच महत्त्व आहे. प्रत्येकाला आपल्या प्रगतीसाठी इंग्रजी बोलण्याची गरज भासू लागली आहे. गावात जेव्हा एखादा वयस्कर व्यक्ती आणि तोही भीक मागणारा इंग्रजी बोलत असेल तर तुम्हालाही थोडे नवलच वाटेल. पाकिस्तानातील लाहोर येथे रस्त्यावरच झोपणारा एक भिकारी जेव्हा स्पष्ट इंग्रजी भाषेत बोलतो. तेव्हा अनेकांना त्याच्याकडून प्रेरणा घेण्यासारखेच आहे. त्याच्या जीवनात नेमकी कोणती समस्या आणि त्याची ही गती झाली हे अद्याप समोर आलेले नाही. पण, संपूर्ण लाहोरमध्ये त्याचे इंग्रजी बोलणे हा चर्चेचा विषय आहे.