चीनला मोठा झटका, तैवाननं चीनचे सुखोई-३५ लढाऊ विमान पाडलं

चीनचे सुखोई-३५ हे लढाऊ विमान पाडल्याचे तैवानकडून कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आली नाही आहे. या विमानाचा वैमानिकही सुखरुप असल्याची माहिती आहे. तैवानच्या हद्दीत सुखोई-३५ हे लढाऊ विमान घुसखोरी करत करण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे तैवानने हे लढाऊ विमान पाडल्याचं सांगितले जात आहे.

चीन : भारत-चीन यांच्यात नियंत्रण सीमारेषेवरुन तणाव कायम आहे. तर चीनला (Chin) तैवाननं मोठा झटका दिला आहे. चीनचे सुखोई-३५ हे लढाऊ विमान तैवानंन पाडल्याची माहिती मिळत आहे. ( Taiwan shot down China’s Sukhoi-35 fighter jet) याबाबत सोशल मिडियावर काही व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. परंतु या वृत्ताला दोन्ही देशांकडून अद्याप कोणताच दुजोरा मिळाला नाही आहे.

चीनचे सुखोई-३५ हे लढाऊ विमान पाडल्याचे तैवानकडून कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आली नाही आहे. या विमानाचा वैमानिकही सुखरुप असल्याची माहिती आहे. तैवानच्या हद्दीत सुखोई-३५ हे लढाऊ विमान घुसखोरी करत करण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे तैवानने हे लढाऊ विमान पाडल्याचं सांगितले जात आहे.

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार तैवाननं चीनला इशारा देऊनही विमान सीमेपलीकडे आले. त्यामुळे तैवाननं चीनच्या सुखोई-३५ या लढाऊ विमानाला पाडल्याचे सांगितले जात आहे. हे वृत्त खरे झाल्यास मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.