bird flu

जवळपास दीड वर्षांपूर्वी चीनच्या वुहानमधून कोरोनाचा संसर्ग जगभरात फैलावला होता. दीड वर्षानंतरही कोरोनाच्या संसर्गाला पूर्णपणे अटकाव करण्यास शक्य झाले नाही. अशातच आता चीनमधून आणखी एक संकट जगावर ओढावण्याची भीती आहे. चीनमध्ये एका व्यक्तीला बर्ड फ्लूच्या विषाणूची बाधा झाल्याचे समोर आले आहे.

    बीजिंग : जवळपास दीड वर्षांपूर्वी चीनच्या वुहानमधून कोरोनाचा संसर्ग जगभरात फैलावला होता. दीड वर्षानंतरही कोरोनाच्या संसर्गाला पूर्णपणे अटकाव करण्यास शक्य झाले नाही. अशातच आता चीनमधून आणखी एक संकट जगावर ओढावण्याची भीती आहे. चीनमध्ये एका व्यक्तीला बर्ड फ्लूच्या विषाणूची बाधा झाल्याचे समोर आले आहे.

    चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने याला दुजोरा दिला आहे. चीनच्या झेनजियांगमधील एका 41 वर्षीय व्यक्तीला बर्ड फ्लूच्या एच 10 एन 3 या विषाणूची बाधा झाली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीला 28 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर एका महिन्यानंतर 28 मे रोजी या व्यक्तीच्या शरिरात एच 10 एन 3 हा स्ट्रेन आढळला.

    या व्यक्तीला एच 10 एन 3 ची बाधा कशी झाली याबाबत आरोग्य आयोगाने कोणतीही माहिती दिली नाही. एच 10 एन 3 हा स्ट्रेन आढळल्याने चिंतेचे कारण नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.