pakistan bus blast

पाकिस्तानमध्ये(Pakistan) बसचा भीषण स्फोट(Blast In A Bus At Pakistan) झाला असून यामध्ये १० जण ठार(10 people died) झाले आहेत.

    पाकिस्तानमध्ये(Pakistan) लष्कर जवान आणि चिनी इंजिनीअर प्रवास करत असणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला झाला आहे. बसचा भीषण स्फोट(Blast In A Bus At Pakistan) झाला असून यामध्ये १० जण ठार(10 people died) झाले आहेत. यामध्ये चार चिनी इंजिनीअर्सचा समावेश आहे.

    आईडीच्या मदतीने हा स्फोट घडवण्यात आला असल्याचे समजते. दरम्यान जखमी झालेल्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

    या बसमध्ये दासू धरणासाठी काम करणारे चिनी इंजिनीअर प्रवास करत होते. बसमध्ये जवळपास ३० इंजिनीअर आणि कामगार होते. जखमींपैकी काहीजण गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

    रस्त्याशेजारी ठेवण्यात आलेल्या स्फोटकामुळे हा स्फोट झाला की बसमध्येच लावण्यात आलं होतं याबद्दल अद्याप खात्रीशीर माहिती मिळालेला नाही. स्फोटानंतर बस दरीत जाऊन कोसळली होती. एक चिनी इंजिनियर आणि एक जवान अद्यापही बेपत्ता आहे. स्फोटानंतर रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात करण्यात आली. जखमींना एअर ॲम्ब्युलन्सच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आलं अशी माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिली आहे.