म्यानमारमध्ये लष्कराचा रक्तरंजित हिंसाचार, आतापर्यंत शेकडो आंदोलकांचा गेला जीव

शनिवारी म्यानमारमध्ये लष्कर दिवस साजरा करण्यात येत होता. यावेळी बर्मा येथे आयोजित एका लष्करी कार्यक्रमाच्या स्थळी आंदोलन कर्त्यांनी मोठा मोर्चा काढला व देशातील लष्करी राजवटीला विरोध दर्शवला. त्यावेळी हे आंदोलन मोडून काढण्यासाठी लष्कराने आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केला. या गोळीबारात ९१ जणांचा मृत्यू झाला. याआधी १४ मार्चला एकाच दिवशी ७४ जणांचा मृत्यू झाला होता.

    म्यानमारमध्ये लष्कराने राष्ट्राध्यक्ष आंग सान स्यू की यांचे सरकार उलथवल्यानंतर तिथे लष्करी राजवट लागू केली आहे. या राजवटीविरोधात गेली महिनाभर तेथील जनता आंदोलन करत असून या आंदोलनाला थोपविण्यासाठी लष्कराने हिंसाचाराचा मार्ग निवडला आहे. एकट्या शनिवारी तब्बल ९१ आंदोलकांचा मृत्यू झाला. म्यानमार माऊ या न्यूज वेबसाईटने ही बातमी दिली आहे.

    शनिवारी म्यानमारमध्ये लष्कर दिवस साजरा करण्यात येत होता. यावेळी बर्मा येथे आयोजित एका लष्करी कार्यक्रमाच्या स्थळी आंदोलन कर्त्यांनी मोठा मोर्चा काढला व देशातील लष्करी राजवटीला विरोध दर्शवला. त्यावेळी हे आंदोलन मोडून काढण्यासाठी लष्कराने आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केला. या गोळीबारात ९१ जणांचा मृत्यू झाला. याआधी १४ मार्चला एकाच दिवशी ७४ जणांचा मृत्यू झाला होता.

    १ फेब्रुवारीला म्यानमारमध्ये सरकार उलथवल्यानंतर लष्कराने या देशावर ताबा मिळवला आहे. तेव्हापासून आतापर्यंत आंदोलनकर्ते व लष्करामध्ये झालेल्या हिंसाचारात ४०० हून अधिक आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला आहे.