bodybuilder

युकेचा बॉडी बिल्डर एडी हॉल (Eddie hall) ज्याला स्ट्राँगमॅन (Strongman) म्हणूनही ओळखलं जातं. त्याची बॉडी पाहून प्रत्येकाला कौतुक वाटतं. जास्तीत जास्त वजन  उचलण्यासाठी एडीला ओळखलं जातं.

    बॉडीबिल्डर्सचे (Bodybuilder) अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. बरेच बॉडीबिल्डर जिममध्ये भारी वजन उचलून घाम गाळताना दिसतात. आपल्या सहकाऱ्यापेक्षा जास्त उचलण्याची स्पर्धाही त्यांच्यात रंगते आणि त्यामुळे आपल्या स्पर्धकांच्या तुलनेत आपलं, शरीराचं वजन वाढवण्यासाठी ते आपल्या जीममधील वजन उचलण्याची क्षमताही वाढवतात.एका बॉडीबिल्डरचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे.

    युकेचा बॉडी बिल्डर एडी हॉल (Eddie hall) ज्याला स्ट्राँगमॅन (Strongman) म्हणूनही ओळखलं जातं. त्याची बॉडी पाहून प्रत्येकाला कौतुक वाटतं. जास्तीत जास्त वजन  उचलण्यासाठी एडीला ओळखलं जातं. त्याला बीस्टही (Beast) म्हणतात. पण भारी वजन उचलण्याच्या नादात त्याच्यासोबत opps मुमेंट घडली. त्याने चक्क पँटमध्येच शी केली.

    सामान्यपणे एडी जेव्हा लेग्ज एक्सरसाइज करतो तेव्हा स्क्वॅट्सच्या बहुतेक सेटने वॉर्मअप करतो. त्यानंतर प्रत्येक सेटसोबत तो वजन वाढवत जातो. काही दिवसांपूर्वीच लिफ्ट करण्याच्या नादात त्याच्या पाय आणि हिप्समध्ये दुखापत झाली होती. त्यातून रिकव्हर झाल्यानंतर त्याने पुन्हा वर्कआऊट सुरू केलं आहे.

    याचदरम्यान त्याचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतो आहे.व्हिडिओत पाहू शकता एडी एक हजार किलोच्या वजनाने लेग प्रेस करतो आहे. हे त्याचं आतापर्यंतचं सर्वात हेवी लिफ्ट होतं. पण हे वजन उचलताना एडीसोबत एक विचित्र घटना घडली. त्याने आपल्या पँटमध्ये पॉटी केली. व्हिडिओत तो त्याच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीशी बोलताना दिसतो आहे की. मी पॉटी केली आहे. तुला वास येत आहे का? आता मला टॉयलेटला जावं लागेल. यानंतर त्याने माफीही मागितली आहे.

    व्हिडिओत एडी आपल्या चाहत्यांना, प्रेक्षकांना इतकं हेवी लिफ्ट करू नये, असा सल्लाही दिला आहे. हा व्हिडिओ एडीने दोन वर्षांपूर्वी यूट्युबवर शेअर केला होता. जो आता पुन्हा व्हायरल होऊ लागला आहे.