hafij saeed

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर ए- तोबयाचा म्होरक्या हाफिज सईदच्या(Hafiz Saeed जोहार टाऊन भागातील घराबाहेर बॉम्बस्फोट करण्यात आला आहे.

    पाकिस्तानातील(Pakistan) लाहोर शहर बॉम्बस्फोटाने(Bomb Blast) हादरले. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर ए- तोबयाचा म्होरक्या हाफिज सईदच्या(Hafiz Saeed) जोहार टाऊन भागातील घराबाहेर बॉम्बस्फोट करण्यात आला आहे.

    अकबर चौकात हा स्फोट झाला आहे. या स्फोटात तब्बल १५ ते २० नागरिक जखमी(15 Injured In Bomb Blast) झाले आहेत. यात दोन जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

    घटनेत जखमी झालेल्या सर्वांना जिना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. बॉम्बस्फोटाबद्दलचा तपास सुरु आहे. मदतकार्यात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून लोकांना घटनास्थळापासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती लाहोरचे सीसीपीओ गुलाम महेमूद डोगर यांनी दिली आहे.