पाकिस्तानमध्ये बॉम्बचे धमाके, ३ सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू तर २० जखमी; नागरिक हैराण

ही घटना मास्टंग रोडवर घडली असून या घटनेची माहिती क्वेटामधील DIG ने दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आणि सुरक्षा दलांना ही माहिती समजताच ते घटनास्थळी दाखल झाले. तसेच जखमींना शेख जैद रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  क्वेटा : पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटामध्ये आज रविवार सकाळच्या दरम्यान बॉम्बचे धमाके झाले आहेत. या धमाक्यांमध्ये तीन सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. ही घटना मास्टंग रोडवर घडली असून या घटनेची माहिती क्वेटामधील DIG ने दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आणि सुरक्षा दलांना ही माहिती समजताच ते घटनास्थळी दाखल झाले. तसेच जखमींना शेख जैद रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  आत्मघाती हल्ला झाल्याची शक्यता

  बॉम्बस्फोट झाल्यानंतर त्याच्या तीव्रतेचं आकलन केलं जात आहे. आतापर्यंत कुठल्याही संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाहीये. अधिकारी या घटनेला आत्मघाती हल्ला समजत आहेत. जरी बॉम्ब निकामी करण्याचे पथक घटनास्थळी आहेत आणि स्फोटाचे कारण शोधत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक लोकांची परिस्थिती अवस्था अद्यापही गंभीर आहे.

  फ्रंटियर कॉर्प्सच्या वाहनाला टार्गेट करून हा हल्ला घडवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. कारण ही कार या विभागात पेट्रोल भरत होती. DIG च्या म्हणण्यानुसार, या हल्लात आणि स्फोटात ५ किलो स्फोटकांचा वापर करण्यात आल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

  क्वेटामध्ये स्फोटकांचे हल्ले सुरूच…

  याआधी ८ ऑगस्ट रोजी क्वेटाच्या प्रसिद्ध सेरेना हॉटेलच्या जवळ स्फोटकांचे हल्ले करण्यात आले होते. यामध्ये जवळपास ८ लोेकांचा मृत्यू झाला होता. बलूचिस्तान सरकारचे प्रवक्ता लियाकत शाहवानी यांनी सांगितलं की, तंजीम चौकच्या जवळ एका पोलिसाला मोबाईलद्वारे टार्गेट केल्यानंतर स्फोटांमध्ये चार लोक जखमी झाले. तर २२ एप्रिल सुद्धा असाच एक हल्ला घडवण्यात आला होता.