पाकिस्तानात शिया मुस्लिमांच्या मिरवणुकीत बॉम्बस्फोट, पाच जणांचा मृत्यू तर 40 जखमी

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलनगरमध्ये शिया मुस्लीम समाजाच्या लोकांनी मिरवणूक काढली होती. परंतु त्याच दरम्यान, त्यांच्या मिरवणुकीत हल्ला करण्यात आला. यामध्ये 5 लोकांचा मृत्यू झाला असून जवळपास 40 लोक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर लोकांमध्ये धावपळ सुरू झाली. याच संंधीचा फायदा घेत हल्लेखोरांनी तेथून पळ काढला.

    इस्लामाबाद: अफगाणिस्तानात कट्टरपंथी तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर त्याचे पडसाद आता पाकिस्तानात उमटत आहेत. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलनगर येथे आज गुरूवारी बॉम्बस्फोट झाला. यामध्ये शिया मुस्लीम समाजाच्या पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर 40 लोक जखमी झाले आहेत.

    पंजाब प्रांतातील बहावलनगरमध्ये मिरवणुकीत बॉम्बस्फोट

    मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलनगरमध्ये शिया मुस्लीम समाजाच्या लोकांनी मिरवणूक काढली होती. परंतु त्याच दरम्यान, त्यांच्या मिरवणुकीत हल्ला करण्यात आला. यामध्ये 5 लोकांचा मृत्यू झाला असून जवळपास 40 लोक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर लोकांमध्ये धावपळ सुरू झाली. याच संंधीचा फायदा घेत हल्लेखोरांनी तेथून पळ काढला.