Booked a helicopter as I wanted to eat burgers

मॉस्को : आली लहर केला कहर असे आपण गमंतीने म्हणतो. मात्र, रशियातील एका व्यक्तीने या ओळीने साजेसे असे कृत्य केले आहे. बर्गर खाण्याची इच्छा झाली म्हणून या व्यक्तीने दोन तासांसाठी हेलिकॉप्टर बुक केले. यानंतर तब्बला ३६२ किलोमीटरवरील मॅकडोनाल्डचे रेस्टॉरंट गाठत त्याने आपली बर्गर खाण्याची इच्छा पूर्ती केली. त्याचा हा पराक्रम पाहून त्याची प्रेयसी चाट पडली.

रशियातील विक्टर मार्टिनोव असे या व्यक्तीचे नाव आहे. विक्टर याला बर्गर खाण्याची इच्छा झाली. त्यांनी जवळचे सर्व रेस्टॉरंट ऑनलाइनवर सर्च केले. मात्र, एकही रेस्टॉरंट त्याला आवडले नाही. अखेरीस ३६२ किलोमीटरवर दूर असलेले एक रेस्टॉरंट त्याला आवडले. मग काय लगेच त्याने हेलिकॉप्टर बुक केले आणि निघाला गर्लफ्रेंडला घेवून बर्गर खायला.

क्रीमिया ते क्रासनोडर अशा ३६२ किलोमीटरच्या हेलिकॉप्टर प्रवासासाठी त्याने तब्बल दोल लाख रुपये मोजले. आवडत्या रेस्टॉरंटमध्ये पोहचल्यावर विक्टरने बिग मॅक, फ्रेंच फ्राइज, मिल्कशेकची ऑर्डर दिली. त्या सर्वांचे बिल झाले ४,८५९. आपल्या गर्लफ्रेंडस त्याने यावर येथेच्छ ताव मारला.

विक्टरचा खासगी याटचा व्यवसाय असून तो करोडपती आहे. विक्टर क्रीमियामध्ये सुटीसाठी आले होते. फक्त बर्गर खाण्यासाठी हेलिकॉप्टर बुक केल्याची ही पहिलीच घटना असल्याचे हेलिकॉप्टर कंपनीने सांगितले.