sex

लग्नाच्या पहिल्या रात्री पतीसोबत शारीरिक संबंधादरम्यान १८ वर्षांच्या तरुणीचा मृत्यू(women Died on first Night of marriage) झाला आहे.

  लग्न ही खरंतर प्रत्येकाच्या आयुष्यातली नव्याने झालेली सुरुवात असते. मात्र सध्या एक अशी घटना समोर आली आहे ज्यात  नववधूच्या आयुष्याचा लग्नाच्या पहिल्या रात्रीच अंत झाला आहे. ही घटना ब्राझीलच्या(Brazil) इबिराइट शहरातील आहे.

  लग्नाच्या पहिल्या रात्री पतीसोबत शारीरिक संबंधादरम्यान १८ वर्षांच्या तरुणीचा मृत्यू(women Died on first Night of marriage) झाला आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे हा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तिच्या शरीरावर कोणत्याही जखमा नसल्यामुळे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

  लग्नानंतर पहिल्याच रात्री आपल्या नवऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेवत असताना या नववधूला हृदयविकाराचा झटका आला.त्यानंतर रुग्णालयात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला.

  पोलिसांनी सांगितलं  की या १८ वर्षीय मुलीचं २९ वर्षांच्या मुलासोबत लग्न झालं. रात्री अचानक तिला अस्वस्थ वाटू लागलं. ती जमिनीवर कोसळल्यावर पतीनं शेजाऱ्यांना फोन करुन दवाखान्यात जाण्यासाठी टॅक्सी आणायला सांगितली.


  तरुणीची अवस्था समजल्यावर ड्रायव्हरने हॉस्पिटलमध्ये जाण्यास नकार देऊन रुग्णवाहिका बोलावण्याचा सल्ला दिला. रुग्णवाहिका येण्यास एक तास लागल्याने पत्नीचा मृृत्यू झाल्याचे पतीचे म्हणणे आहे.

  शवविच्छेदन अहवालानुसार, महिलेला ब्रोंकायटिस होता. या आजारात श्वासनलिकेत सूज येते. पोलिसांच्या मते, महिलेच्या शरीरावर मारहाण केल्याचे कोणतेही पुरावे नव्हते.लग्नाच्या पहिल्या रात्री नवरीचा मृत्यू झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.