ब्रिटनकडून पाकिस्तानी प्रवाशांना बंदी, पाकिस्तानातील विमानतळावर अभूतपूर्व गोंधळ, नियम न पाळणाऱ्यांना पाठवले माघारी

कोरोनावर मात करण्यासाठी आखलेल्या कडक उपाययोजनांचा भाग म्हणून ब्रिटनने पाकिस्तानमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. पाकिस्तानमधून एकही प्रवासी ब्रिटनमध्ये येऊ दिला जाणार नसल्याचा फैसला ब्रिटननं केलाय. त्यामुळं ब्रिटनला यायला निघालेले शेकडो प्रवासी पाकिस्तानमधील विमानतळांवर अडकून पडलेत. 

    गेल्या वर्षभरापासून कोरोना जगभरात धुमाकूळ घालत आहे. अनेक देशांत सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून प्रत्येक देशाने इतर देशांतील प्रवाशांवर आणि आंतरराष्ट्रीय वाहतुकीवर काही प्रमाणात निर्बंध घालायला सुरुवात केलीय. ब्रिटनने घातलेल्या अशाच निर्बंधांचा फटका सध्या पाकिस्तानला बसताना दिसत आहे.

    कोरोनावर मात करण्यासाठी आखलेल्या कडक उपाययोजनांचा भाग म्हणून ब्रिटनने पाकिस्तानमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. पाकिस्तानमधून एकही प्रवासी ब्रिटनमध्ये येऊ दिला जाणार नसल्याचा फैसला ब्रिटननं केलाय. त्यामुळं ब्रिटनला यायला निघालेले शेकडो प्रवासी पाकिस्तानमधील विमानतळांवर अडकून पडलेत.

    सर्व तयारीनिशी ब्रिटनला जाण्यास निघालेल्या या प्रवाशांनी आता गोंधळ घालायला सुरुवात केलीय. प्रवासी विमान बंद असेल, तर प्रसंगी मालवाहतूक करणाऱ्या विमानाने का असेना, पण आम्हाला ब्रिटनला घेऊन चला, अशी मागणी हे प्रवासी करत आहेत. मात्र ब्रिटननं नियमांत कुठलेही बदल करायला नकार देत यापुढे पुढील आदेश येईपर्यंत एकाही पाकिस्तानी प्रवाशाला ब्रिटनमध्ये प्रवेश दिला जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय.

    दरम्यान, जे प्रवासी पाकिस्तानातून ब्रिटनमध्ये पोहोचले, त्यांना नियमानुसार हॉटेलमधील विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय़ ब्रिटन प्रशासनानं घेतला होता. हे विलगीकरण मान्य नसलेल्या अनेक प्रवाशांनी परत पाकिस्तानमध्ये परतण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे शेकडो पाकिस्तानी प्रवासी ब्रिटनहून त्यांच्या मायदेशी परतल्याचंही चित्र आहे.