ब्रिटनचे पंतप्रधान येणार भारतात, ब्रेक्झिटनंतरची पहिलीची भारत भेट, हे आहे कारण

ब्रेक्झिटनंतरच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यासाठी त्यांनी भारताची निवड केलीय. ब्रिटन आणि भारत यांचे संबंंध ऐतिहासिक आणि सलोख्याचे आहे. विशेष म्हणजे युरोपातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्वतंत्र अर्थव्यवस्था आणि स्वतंत्र चलनवलन सुरू झालेल्या ब्रिटनला आता नवे व्यापारी संबंध प्रस्थापित करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने ब्रिटन सरकारनं पावलं उचलायला सुरु केल्याचं चित्र आहे. 

    ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे ब्रिटनच्या इतिहासातील एक महत्त्वाचे पंतप्रधान ठरले आहेत. जॉन्सन यांच्या कार्यकाळातच ब्रेक्झिट प्रत्यक्ष अस्तित्वात आलं. त्यापूर्वी अनेक पंतप्रधानांनी यासाठी प्रयत्न केले, काहींनी आपलं पदही गमावलं होतं. मात्र प्रत्यक्ष ब्रेक्झिट घडताना बोरिस जॉन्सन ब्रिटनचे पंतप्रधान होते. ब्रेक्झिटची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता पहिल्यांदाच ते आंतरराष्ट्रीय दौरा करत आहेत.

    ब्रेक्झिटनंतरच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यासाठी त्यांनी भारताची निवड केलीय. ब्रिटन आणि भारत यांचे संबंंध ऐतिहासिक आणि सलोख्याचे आहे. विशेष म्हणजे युरोपातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्वतंत्र अर्थव्यवस्था आणि स्वतंत्र चलनवलन सुरू झालेल्या ब्रिटनला आता नवे व्यापारी संबंध प्रस्थापित करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने ब्रिटन सरकारनं पावलं उचलायला सुरु केल्याचं चित्र आहे.

    भारत ही लोकसंख्येमुळे जगातील उत्तम बाजारपेठ मानली जाते. भारतात आपली उत्पादने विकायला जगातील मोठमोठ्या कंपन्या उत्सुक असतात. भारत आणि ब्रिटन यांच्यात जुने व्यापारी संबंध असले, तरी युरोपातून बाहेर पडल्यामुळे अनेक समीकऱणे बदलणार आहेत. नवे व्यापारी संबंध प्रस्थापित करून नवे करार करण्याच्या हेतूनं पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या दौऱ्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जॉन्सन हे भारत भेटीवर येतील, असं सांगितलं जातंय.

    अर्थात, कोरोनाच्या त्यावेळच्या परिस्थितीवरदेखील या दौऱ्याचं भवितव्य अवलंबून आहे. मात्र आता दोन्ही देशांत कोरोनाचं लसीकरण सुरू असून एप्रिलपर्यंत कोरोना रुग्णवाढीचा आकडा आणखी खाली येईल, असा अंदाज व्यक्त कऱण्यात येत आहे. या भेटीनंतर भारत आणि ब्रिटन यांच्यातील संबंध अधिक दढ होतील, असं सांगितलं जातंय.