काबूल विमानतळावरील बॉम्बस्फोटानंतर ब्रिटनने दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

काबुलमध्ये आणखी स्फोट होण्याची शक्यता असल्याचे अनेक माध्यमांच्या अहवालात म्हटले आहे. दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (ISIS) ने आपल्या दाव्यात या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. ब्रिटिश संरक्षण सचिव बेन वॉलेस यांनी एका न्यूजला सांगितले की, आम्ही आमच्या लोकांना बाहेर काढत आहोत. सुमारे १,००० लोक आता हवाई क्षेत्राच्या आत आहेत.

    काबूल विमानतळावर काल बॉम्बस्फोट हल्ले घडवण्यात आले. यामध्ये अफगाणिस्तानच्या 85 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 13 अमेरिकन सैनिकांचा देखील यामध्ये समावेश आहे.  तीन आत्मघाती बॉम्बस्फोटांनंतर सर्व देशांनी सतर्क राहण्यास सुरूवात केली आहे. ब्रिटनने अफगाणिस्तानातून निर्वासन प्रक्रिया काही तासांत पूर्ण करेल, असे स्पष्ट केले आहे.

    काबुलमध्ये आणखी स्फोट होण्याची शक्यता असल्याचे अनेक माध्यमांच्या अहवालात म्हटले आहे. दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (ISIS) ने आपल्या दाव्यात या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. ब्रिटिश संरक्षण सचिव बेन वॉलेस यांनी एका न्यूजला सांगितले की, आम्ही आमच्या लोकांना बाहेर काढत आहोत. सुमारे १,००० लोक आता हवाई क्षेत्राच्या आत आहेत. एकूणच ही प्रक्रिया आता बंद होत आहे, आमच्याकडे फक्त काही तास आहेत.

    इस्लामिक स्टेटने आपल्या दाव्यात म्हटले आहे की, त्यांनी अमेरिकन सैनिक आणि अफगाण नागरिकांना लक्ष्य केले. या स्फोटावर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी हे हल्ले घडवून आणलेत आणि ज्यांना अमेरिकेला त्रास देण्याची इच्छा आहे. त्यांनी लक्षात ठेवावं की आम्ही तुम्हाला माफ करणार नाही आणि आम्ही हा हल्ला विसरणारही नाही.