Britain, the. New strain of corona found in Japan after Africa; The Prime Minister gave a serious warning

टोकियो : ब्रिटन, दक्षिण आफ्रिकेनंतर आता जपानमध्ये कोरोनाचा नवीन स्ट्रेन आढळून आल्याने चिंता वाढली आहे. संशोधकांनी हा नवीन स्ट्रेन ब्रिटनमध्ये सापडलेल्या स्ट्रेनपेक्षा जास्त संक्रमक असल्याचा इशारा दिला आहे. हा कोरोनाचा नवीन स्ट्रेन ब्राझीलहून परतलेल्या ४ लोकांमध्ये सापडला आहे.

जपानमध्ये सापडलेला नवीन स्ट्रेन हा अद्याप विकसित झालेला नाही. यामुळे तो किती वेगाने पसरू शकतो याची माहिती मिळालेली नाही. जगभरात कोरोना लस दिली जात आहे. मात्र, या नवीन स्ट्रेनवर या कोरोना लशी प्रवाभी ठरतील की नाही देखील अद्याप समजू शकलेले नाही.

जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी खबरदारीचा इशार दिला आहे. जपानमध्ये वेगाने कोरोना व्हायरस पसरत आहे. हा फैलाव रोखण्यासाठी जपानमध्ये आपत्कालीन स्थितीची घोषणा करण्यात आली आहे.६ फेब्रुवारीपर्यंत ही बंदी लागू करण्यात आली आहे.