In the dark due to increased electricity bill of destitute animals

  अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील (California) मध्ये एक अद्भुत चमत्कारिक गोष्ट आहे. इथं एक विद्युत बल्ब (Electric Bulb burning from 120 years) १२० वर्षांपासून जळतो आहे. इतक्या वर्षांत तो फक्त २ ते ४ वेळा माणसाच्या चुकीमुळे बंद पडला होता. इतकी वर्षे सलग पेटण्याचा विक्रम नोंदवणाऱ्या या चमत्कारी बल्बची गिनीज बुकसह  अनेक विश्वविक्रमांमध्ये नोंद झाली आहे.

  कॅलिफोर्नियामधील लिव्हरमोर (Livermore) शहरातील फायर ब्रिगेड विभागाच्या गॅरेजमध्ये हा बल्ब लावण्यात आलेला आहे. या बल्बमुळे या शहराला एक विशेष ओळख मिळाली आहे. हा बल्ब १२० वर्षांपासून सतत कसा जळत आहे? याबद्दल लोकांच्या मनामध्ये कुतूहल आहे . कारण कोणत्याही बल्बचे फिलामेंट १-२ वर्षांपेक्षा जास्त काळ टिकू शकत नाहीत, असं तज्ज्ञ सांगतात.

  या बल्बला सेंटेनियल (Centennial) म्हणून ओळखले जाते. १९०१ मध्ये हा पहिल्यांदा प्रकाशित झाला होता, तेव्हापासून आतापर्यंत तो सतत पेटता राहिला आहे. १९०१मध्ये हा बल्ब ६० वॅटचा होता. मग त्याची शक्ती क्षीण झाली. आता २०२१मध्ये या बल्बचा प्रकाश ४ वॅट्स इतकाच राहिला आहे.

  हा बल्ब ओहायो (Ohio) इथल्या शेल्बी इलेक्ट्रॉनिक्स (Shelbi Electronics) कंपनीनं १८९०च्या उत्तरार्धात बनवला होता. लिव्हरमोर पॉवर अँड वॉटर कंपनीचे मालक डॅनियल बर्नल यांनी तो विकत घेतला होता. होते. हा बल्ब विकत घेतल्यानंतर त्यांनी तो शहरातील अग्निशमन केंद्राला दान केला. तेव्हा पेटलेला हा बल्ब आजतागायत जळत आहे.

  आजतागायत जगात कोणताही बल्ब इतका प्रदीर्घ काळ पेटलेला नाही. असा हा एकमेव बल्ब आहे. १२० वर्षांच्या या प्रवासामध्ये, फक्त दोन वेळा तो बंद करण्यात आला होता. १९३७ मध्ये पहिल्यांदा हा बल्ब बंद करण्यात आला कारण तेव्हा या अग्निशमन केंद्रातील इलेक्ट्रिक लाईन्स बदलण्यात येणार होत्या. हे काम झाल्यानंतर पुन्हा हा बल्ब सुरू करण्यात आला. यानंतर१९७६ मध्ये अग्निशमन केंद्राची इमारत बदलणार होती. तेव्हा हा बल्ब बंद ठेवण्यात आला होता. एका शानदार संचलनासह हा बल्ब नवीन इमारतीत हलवण्यात आला. तेव्हा २२ मिनिटांसाठी तो बंद होता. नव्या जागेत पोहोचताच पुन्हा तो पेटवण्यात आला आणि तेव्हापासून तो अखंड जळतोच आहे.

  त्याच्या अखंड पेटता राहण्याचे रहस्य तरी काय असावे? या प्रश्नाचे उत्तर त्याचं विशेष डिझाइन असं दिलं जातं. हेच यामागचं रहस्य असल्याचा लोकांचा विश्वास आहे. या सेंटिनियल बल्बचा निर्माता एडोल्फ चॉलीएट (Adolf Chollet) होता. इलेक्ट्रिक बल्बचा शोध थॉमस अल्वा एडिसन (Thomas Alva Edison) यांनी लावला असला तरी त्याचे उत्पादन वेगवेगळ्या कंपन्या करत असत. सुरुवातीच्या काळात खूप दिवस चालतील असे बल्ब तयार करण्यात आले होते. १९२० च्या दशकात जगभरात इलेक्ट्रिक बल्ब बनविणार्‍या कंपन्यांनी १५०० तासांपेक्षा अधिक काळ टिकू नयेत, असे बल्ब बनवण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून बल्ब खराब झाल्यावर ग्राहक नवीन बल्ब खरेदी करतील. बल्बचा शोध लागल्यानंतरच्या काळात हा बल्ब निर्माण करण्यात आला होता. त्यामुळं त्याची रचनाच प्रदीर्घ काळ टिकण्याच्या दृष्टीनं करण्यात आली होती. २०१३ मध्ये हा बल्ब फ्युज झाल्याचं दिसून आलं, परंतु वायर तपासल्यानंतर लक्षात आलं की बल्ब नव्हे तर ७६ वर्षे जुनी वायर खराब झाली आहे. वायर बदलताच बल्ब पुन्हा पेटू लागला.

  http://www.centennialbulb.org/cam.htm या वेबसाइटवर या बल्बबाबतची सर्व माहिती, फोटो तसंच ऐतिहासिक घटनांची माहिती देण्यात आली आहे.