burkha ban in Sri Lanka; Avoid a thousand madrassas

बुरख्यासोबत अनेक मदरसेही बंद करण्याचा निर्णय श्रीलंकन सरकारने घेतला आहे. 2019 मध्ये श्रीलंकेत एका चर्चमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. सुमारे 250 जण या हल्ल्यात मृत्युमुखी पडले होते. तेव्हापासून बुरखा बंदीची मागणी जोर धरत होती. तसंच काही अंशी बुरखाबंदी लागूही करण्यात आली होती. आता त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

    कोलंबो : मुस्लीम महिलांच्या बुरखा या वेशावर कायमस्वरूपी बंदी घालण्याचे आदेश श्रीलंकेत देण्यात आले आहेत. तसेच इस्लामचे शिक्षण देणारे मदरसेही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीलंकेचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री सरथ वेरासेकेरा यांनी या निर्णयाबाबत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

    मुस्लीम महिलांचं परिधान असलेला बुरखा किंवा तत्सम अन्य कोणत्याही चेहरा संपूर्ण झाकणाऱ्या पोशाखांवर कायमस्वरूपी बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे वेरासेकेरा म्हणाले.

    या निर्णयाला कॅबिनेटची मंजुरी मिळाली असून या आदेशांवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. वेरासेकेरा यांच्या म्हणण्यानुसार, आधीपासून इथल्या मुस्लीम महिला बुरखा परिधान करत नव्हत्या. बुरख्याची प्रथा काही काळापूर्वीच सुरू झाली आहे. याचा कायमस्वरूपी प्रतिबंध करण्याच्या विचारात आम्ही आहोत, असं ते म्हणाले.