आशियात सर्वात श्रीमंत कोण? मुकेश अंबानी दुसऱ्या स्थानावर

नोंगफू स्प्रिंग मिनरल वॉटर हा व्यवसाय त्यांनी सुरू केला आणि बघता बघता त्याला भव्य स्वरूप प्राप्त झालं. त्याचबरोबर त्यांनी औषध कंपनी वेन्टाई बायोलॉजिकल फार्मसी एंटरप्राईजकडून लसींची निर्मितीही केली जाते. या दोन्ही कंपन्यांचं गेल्या वर्षीच चीनच्या शेअर बाजारात लिस्टिंग झालं. 

    आशिया खंडात सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण, या प्रश्नाचं उत्तर आता बदललंय. आतापर्यंत या प्रश्नाचं होतं मुकेश अंबानी. मात्र आता चीनमधील एका उद्योगपतींनी मुकेश अंबांनींनाही मागे टाकत त्यांच्यापेक्षा श्रीमंत असल्याचं सिद्ध झालंय.

    चीनमधील प्रसिद्ध उद्योगपती झोंग शान्शान हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्याचं सिद्ध झालंय. ब्लूमबर्गने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालानुसार झोंग यांचे नाव आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून नोंदवलं गेलंय. झोंग यांची एकूण मालमत्ता ८५ अब्ज डॉलर इतकी झालीय. झोंग यांचा प्रमुख व्यवसाय पाणी विकण्याचा आहे. या व्यवसायातूनच त्यांनी त्यांची संपत्ती जमा केलीय.

    नोंगफू स्प्रिंग मिनरल वॉटर हा व्यवसाय त्यांनी सुरू केला आणि बघता बघता त्याला भव्य स्वरूप प्राप्त झालं. त्याचबरोबर त्यांनी औषध कंपनी वेन्टाई बायोलॉजिकल फार्मसी एंटरप्राईजकडून लसींची निर्मितीही केली जाते. या दोन्ही कंपन्यांचं गेल्या वर्षीच चीनच्या शेअर बाजारात लिस्टिंग झालं.

    झोंग यांनी पत्रकारिता, शेती आणि आरोग्य या तिन्ही क्षेत्रांत काम केलंय. १९९६ साली झोंग यांनी मिनरल वॉटर कंपनी सुरू केली होती. या कंपनीचं भांडवल आज ५.७ अब्ज डॉलरवर पोहोचलंय. झोंग हे आशियातील सर्वात श्रीमंत तर जगातील श्रीमंतांच्या क्रमवारीत १७ वे असल्याची माहिती ब्लुमबर्ग बिलिनियर्स इंडेक्समध्ये देण्यात आलीय.

    झोंग यांनी मुकेश अंबांनींना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असण्याचा बहुमान मिळवलाय. यात त्यांना कोरोना साथीनं मोठी मदत केल्याचं सांगितलं जातंय. गेल्या वर्षी त्यांच्या कंपनीनं कोरोनावरील लस विकसित केली. त्यामुळे झोंग यांच्या संपत्तीत चांगलीच भर पडली.