.. पण चर्चा होतेय गर्भवती पुरूष इमोजीची ;Emoji १४. ०रिलीज

Emojipedia ने Emoji 14.0 रिलीज केला आहे. या अपडेटमध्ये अनेक नवीन इमोजी जोडण्यात आल्या आहेत. या नवीन इमोजीमुळे ऑनलाईन संवाद अजून रंगतदार होईल, या अपडेटेड इमोजीच्या यादीत गर्भवती पुरुष आणि गर्भवती व्यक्तीची इमोजी सर्वाधिक चर्चेत आल्या आहेत.

    दरवर्षी १७ जुलैला World Emoji Day साजरा केला जातो. यंदा या दिवसाच्या निमित्ताने Emojipedia (इमोजीपीडियाने ) काही नवीन इमोजी सादर केल्या आहेत. Emojipedia ने नेक्स्ट इमोजी अपडेट Emoji 14.0 रिलीज केला आहे. या अपडेटमध्ये अनेक नवीन इमोजी जोडण्यात आल्या आहेत. या नवीन इमोजीमुळे ऑनलाईन संवाद अजून रंगतदार होईल, या अपडेटेड इमोजीच्या यादीत गर्भवती पुरुष आणि गर्भवती व्यक्तीची इमोजी सर्वाधिक चर्चेत आल्या आहेत.
    यामध्ये Emoji 14.0 व्हर्जनच्या यादीत मोटरसाइकिल टायर, स्लाइड, डिस्को बॉल, क्लबसह ट्रोल, किडनी बीन्स आणि लो बॅटरी इमोजीचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर एक मुकुट परिधान केलेला व्यक्ती वेगवेगळ्या त्वचा रंगांसह जोडण्यात आला आहे. तसेच इमोजीमध्ये पिवळ्या गोलाकार चेहऱ्याच्या देखील काही आवृत्ती जोडण्यात आल्या आहेत. यात मेल्टिंग फेस, सॅल्यूटिंग फेस, डॉटेड लाइन फेस अश्या इमोजीस सादर करण्यात आल्या आहेत.

    नवीन इमोजीची यादी

    Person with Crown
    Pregnant Man
    Pregnant Person
    Biting Lip
    Troll
    Coral
    Lotus
    Empty Nest
    Nest with Eggs
    Beans
    Pouring Liquid
    Jar
    Playgrounds Slide
    Wheel
    Rolling Buoy
    Hamsa
    Melting Face
    Face, Open Eyes, Hand Over Mouth
    Face With Peeking Eye
    Saluting Face
    Dotted Line Face
    Face with Diagonal Mouth
    Face Holding Back Tears
    Palm Down Hand
    Palm Up Hand
    Hand with Index Finger and Thumb Crossed
    Index Pointing at the Viewer
    Hear Hands
    Handshake (Skin Tone Combinations)
    Mirror Ball
    Low Battery
    Crutch
    X-Ray
    Bubbles
    Identification Card
    Heavy Equals Sign

    मात्र इमोजीपीडियाच्या म्हणण्यानुसार हा फक्त एक ड्राफ्ट इमोजी लिस्ट आहे, यात सप्टेंबर २०२१ पर्यंत बदल केले जाऊ शकतात.