कॅनडाच्या पंतप्रधानांचा बोलविता धनी चीन? जस्टीन ट्रुडोंवर समाजमाध्यमांत टीकेचा भडिमार

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी शेतकरी आंदोलनावरून भारत सरकारवर टीका केल्यानंतर जस्टीन यांचा चीनधार्जिणा चेहरा कसा आहे, याची जोरदार चर्चा समाजमाध्यमांमध्ये सुरू झालीय. २०१९ साली जस्टीन ट्रुडो यांनी कॅनडा आणि चीनचं सैन्य एकत्र युद्धाभ्यास करेल, अशी योजना आखली होती. ही योजना पूर्ण झाली नाही, मात्र ट्रुडो यांचा चीनधार्जिणेपणा यातून उघड झाला होता.

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात सध्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावरून भारत सरकारवर टीका करणाऱ्या कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्यावर सोशल माध्यमातून जोरदार टीका होताना दिसतेय. भारतातील अंतर्गत प्रश्नात ट्रुडो यांनी लक्ष घालण्याची गरज काय, असा सवाल नेटीझन्स विचारत आहेत.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी शेतकरी आंदोलनावरून भारत सरकारवर टीका केल्यानंतर ट्रुडो यांचा चीनधार्जिणा चेहरा कसा आहे, याची जोरदार चर्चा समाजमाध्यमांमध्ये सुरू झालीय. २०१९ साली जस्टीन ट्रुडो यांनी कॅनडा आणि चीनचं सैन्य एकत्र युद्धाभ्यास करेल, अशी योजना आखली होती. ही योजना पूर्ण झाली नाही, मात्र ट्रुडो यांचा चीनधार्जिणेपणा यातून उघड झाला होता.

नुकत्याच उघड झालेल्या कागदपत्रांनुसार कॅनडाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जोनाथन वेन्स यांनी या योजनेला आक्षेप घेत ती हाणून पाडली होती. त्यामुळे जस्टीन ट्रुडो यांचा चांगलाच सात्विक संताप झाला होता.

या संयुक्त युद्धाभ्यासाचा खरा फायदा चीनलाच झाला असता. हे लक्षात आल्यानंतर वेन्स यांनी या योजनेला आक्षेप घेतला होता. अमेरिकेच्या दृष्टीनंदेखील चीनसोबत कॅनडाच्या सैन्यानं युद्धाभ्यास करणं ही चीनची ताकद वाढवण्यासारखंच होतं. त्यामुळे अमेरिकेचाही त्याला विरोध होता.

जस्टीन ट्रुडो यांनी भारतातील शेतकरी आंदोलनावर टीका केली होती. समाजातील प्रत्येक घटकाला त्यांचे मुद्दे शांततेनं मांडण्याचा अधिकार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. जगात कुठेही शांततापूर्ण मार्गानं चालणाऱ्या आंदोलनांना कॅनडाचा नेहमीच पाठिंबा राहिल, असंही ते म्हणाले होते. भारतातील अंतर्गत विषयांवर जाहीर भाष्य केल्याबद्दल भारताकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.