चीनवर यापेक्षा जास्त दबाव टाकू शकत नाही, WHO नं व्यक्त केली हतबलता, कोरोना व्हायरसच्या जन्मकथेचं गूढ कायम

चीनवर आता व्हायरसच्या निर्मितीचा शोध घेण्यासाठी यापेक्षा अधिक दबाव टाकू शकत नाही, अशी हतबलता जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) व्यक्त केलीय. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी अशी हतबलता व्यक्त केलीय. यापूर्वीदेखील WHO च्या सदस्यांनी चीनला भेट दिली असून वारंवार या गोष्टीसाठी आम्ही चीनवर दबाव टाकू शकत नाही, असं म्हटलंय. 

    गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने जगभर धुमाकूळ घातलाय. जगातील जवळपास सर्व देशांमधील हजारो नागरिकांचा यात मृत्यु झाला. अनेक देशांच्या अर्थव्यवस्था गडगडल्या, सामान्य नागरिक देशोधडीला लागले. या कोरोना व्हायरसचा उगम चीनमध्ये झाला असला तरी तो प्राण्यांपासून झाला की लॅबमधून हा व्हायरस बाहेर पडला, याचे गूढ अद्यापही कायम आहे.

    चीनवर आता व्हायरसच्या निर्मितीचा शोध घेण्यासाठी यापेक्षा अधिक दबाव टाकू शकत नाही, अशी हतबलता जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) व्यक्त केलीय. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी अशी हतबलता व्यक्त केलीय. यापूर्वीदेखील WHO च्या सदस्यांनी चीनला भेट दिली असून वारंवार या गोष्टीसाठी आम्ही चीनवर दबाव टाकू शकत नाही, असं म्हटलंय.

    गेल्या वेळी जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी चीनचा दौरा करून आले होते. त्यावेळी वुहानमधील लॅबलाही त्यांनी भेट दिली होती. वुहानमधील लॅबमधून कोरोनाचा विषाणू बाहेर पडला, याचा कुठलाही पुरावा आढळला नसल्याचं या टीमनं दौऱ्यानंतर सांगितलं होतं. मात्र चीननं पुरावे नष्ट केले का, चीन पारदर्शक पद्धतीनं माहिती देत आहे का, असे अनेक सवाल सतत विचारले जात आहेत.

    अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर वुहानच्या लॅबमध्येच कोरोनाचा विषाणू तयार झाल्याचं सांगत चीनवर जगानं दंड लावायला हवा, अशी मागणी केलीय. चीनमधील लॅबमधून जाणीवपूर्वक हा विषाणू तयार करण्यात आला, असा दावा ट्रम्प यांच्याप्रमाणे अनेकजण करतायत. तर प्राण्यांमधून हा विषाणू माणसाच्या शरीरात आला असावा, असा अंदाज व्यक्त करणारेही अनेकजण आहेत.