naked

फ्रान्समध्ये(France) एक असं ठिकाण आहे जे न्युडिटीसाठी(Nudist City Of France) प्रसिद्ध आहे. Cap d'Agde असं या ठिकाणाचं नाव आहे.

    नवी दिल्ली : प्रत्येक देशाची आपली एक संस्कृती असते. प्रत्येक देशाची आपली एक खासियत असते. मात्र, फ्रान्समध्ये(France) एक असं ठिकाण आहे जे न्युडिटीसाठी(Nudist City Of France) प्रसिद्ध आहे. Cap d’Agde असं या ठिकाणाचं नाव आहे. इथले लोक बिनधास्त कपड्यांशिवाय फिरताना दिसतात.

    फ्रान्सच्या समुद्राजवळ गावाप्रमाणेच एक रिसॉर्ट आहे. याचं नाव Cap d’Agde आहे. हे गाव आपल्या अनोख्या लाइफस्टाइलमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. Cap d’Agde ही जगातील एकमेव अशी जागा आहे, जिथे दुरुनही अनेक पर्यटक न्यूड टूरिझम (Nude Tourism) म्हणजेच कपड्यांविना फिरण्यासाठी येतात. इथे येणारे पर्यटकही आरामात कपडे न घालताच फिरू शकतात.

    या न्यूड सिटीमध्ये लोक शॉपिंग मॉल आणि रेस्टॉरंटमध्येही कपडे न घालता वावरतात. त्यांना कपड्यांसाठी कोणतंही बंधन नसतं. उन्हाळ्यात पन्नास हजारपेक्षा जास्त लोक या न्यूड लाइफचा आनंद घेण्यासाठी पोहोचतात. Cap d’Agde हनिमून डेस्टिनेशनसाठीही (Famous Honeymoon Destination) जगभरात प्रसिद्ध आहे. इथे येणारे कपर अगदी आरामात हवं तसं फिरू शकतात.

    Cap d’Agde मध्ये विना कपडे फिरण्याची परवानगी असली तरी दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी पार्टनरसोबत इन्टिमेट (Intimate) स्थितीत आढळल्यास दंडही भरावा लागतो. रोमान्स केल्यास इथे जवळपास तेरा हजार पाउंडपर्यंतचा दंड द्यावा लागू शकतो. इतकंच नाही तर इथेफोटोग्राफी करण्यासही मनाई आहे.