China loses power, fears of losing working hands: China's population growth slows over last 10 years

चीनमध्ये सत्तेत असलेल्या कम्युनिस्ट पार्टीनं(Communist party) तीन मुलांना जन्म देण्याची परवानगी(Three Child Policy Approved In China) दिली आहे. या पॉलिसीला शुक्रवारी जाहीर समर्थन देण्यात आलं आहे. गेल्या काही वर्षात चीनमध्ये जन्मदर(Birthrate Low In China) कमी झाला आहे. त्यामुळे ही नवी पॉलिसी लागू करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

    जगात सर्वाधिक लोकसंख्या चीन(China) या देशामध्ये आहे. मात्र आता चीनला वृद्ध लोकसंख्येच्या(Old Population Increasing) चिंतेने ग्रासले आहे. चीनने त्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे. चीनमध्ये सत्तेत असलेल्या कम्युनिस्ट पार्टीनं(Communist party) तीन मुलांना जन्म देण्याची परवानगी(Three Child Policy Approved In China) दिली आहे. या पॉलिसीला शुक्रवारी जाहीर समर्थन देण्यात आलं आहे. गेल्या काही वर्षात चीनमध्ये जन्मदर(Birthrate Low In China) कमी झाला आहे. त्यामुळे ही नवी पॉलिसी लागू करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. चीनमध्ये वयोवृद्ध लोकांची संख्या वाढत आहे. वयोवृद्ध लोकसंख्येमुळे भविष्यात समस्या उद्भवायला नको म्हणून चीनने तीन मुलांना जन्म देण्यासाठी परवानगी दिली आहे.

    नॅशनल पीपुल्स काँग्रेसच्या स्थायी समितीने सुधारित लोकसंख्या आणि कुटुंब नियोजन कायदा पारित केला आहे. चीनी दांपत्यांना तीन मुलं जन्माला घालण्याची परवानगी देण्यात आली आहे. चीनमध्ये महागाईमुळे मुलांना जन्म देताना लोक विचार करत आहेत. त्यामुळे नवीन कायद्यामध्ये मुलांच्या पालनपोषणासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. तसेच कुटुंबावरील आर्थिक ओझं कमी करण्यासाठी कर,विमा, शिक्षण, रोजगारासाठी धोरणं आखली आहेत.

    चीनने याआधी ‘टू चाइल्ड पॉलिसी’ अंतर्गत फक्त दोन मुलांना जन्म देण्याची परवानगी होती. या नियमामुळे देशातील लोकसंख्या नियंत्रणात आली. मात्र देशातील अर्ध्याहून अधिक नागरिक वयोवृद्ध होत असल्याने चीनला धास्ती भरली आहे. त्यामुळे हा नियम शिथील करण्याचा निर्णय चीन सरकारने घेतला आहे. चीनमध्ये आता दांपत्य तीन मुलांना जन्म देऊ शकतात.