China disrupts India's medical supplies; All cargo flights to India have been suspended for 15 days

कोरोनाच्या लढाईत चीनने भारताला मदतीचे आश्वासान दिले होते. मात्र, मदतीपूर्वीच त्याने आपला खरा चेहरा दाखविला आहे. आता चीनने भारताला मेडिकल उपकरणांचा पुरवठा करण्यास नकार दिला आहे. चीनच्या सरकारी सिचुआन एअरलाइन्सने भारतासाठी होणारी सर्व कार्गो उड्डाणे १५ दिवसांसाठी स्थगित केली आहेत. सिचुआन चुआनहांग लॉजिस्टिक कॉरपोरेशन लिमिटेडने एक पत्र काढून ही माहिती दिली आहे.

    बीजिंग : कोरोनाच्या लढाईत चीनने भारताला मदतीचे आश्वासान दिले होते. मात्र, मदतीपूर्वीच त्याने आपला खरा चेहरा दाखविला आहे. आता चीनने भारताला मेडिकल उपकरणांचा पुरवठा करण्यास नकार दिला आहे. चीनच्या सरकारी सिचुआन एअरलाइन्सने भारतासाठी होणारी सर्व कार्गो उड्डाणे १५ दिवसांसाठी स्थगित केली आहेत. सिचुआन चुआनहांग लॉजिस्टिक कॉरपोरेशन लिमिटेडने एक पत्र काढून ही माहिती दिली आहे.

    १५ दिवसांसाठी उड्डाणे रद्द

    या पत्रात लिहिले आहे, विमान कंपनी शियान-दिल्लीसह सहा मार्गांवरील आपली कार्गो सेवा स्थगित करत आहे. हा निर्णय दोन्ही देशांतील खासगी व्यापाऱ्यांनी चीनमधून ऑक्सिजन काँसनट्रेटर खरेदीच्या प्रयत्नादरम्यानच घेण्यात आला आहे. कंपनीच्या पत्रात म्हणण्यात आले आहे, की भारतात महामारी वाढल्याने आयात घटली आहे. अशात पुढील १५ दिवसांसाठी उड्डाणे स्थगित केली जात आहेत. चीनकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हणण्यात आले आहे, की सप्लाय रोखण्याच्या निर्णयामुळे येथील कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी आम्ही क्षमा मागतो.

    चिनी कंपन्यांनी मेडिकल उपकरणांच्या किमतीत वाढ

    पत्रानुसार, कार्गो उड्डाणे स्थगित केल्याने एजंट्स आणि सामान पाठविणारे लोकही परेशान झाले आहेत. याचबरोबर, अशीही तक्रार आहे, की चिनी उत्पादकांनी ऑक्सिजनसंबधित उपकरणांच्या किंमतीत ३५ ते ४० टक्क्यांची वाढ केली आहे. तसेच, माल वाहतूक शुल्कातही जवळपास २० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.

    शांघायच्या सायनो ग्लोबल लॉजिस्टिक कंपनीचे मालक सिद्धार्थ सिन्हा यांनी सांगितले, की सिचुआन एअरलाइन्सच्या निर्णयाचा दोन्ही देशांच्या व्यापाऱ्यांवरही परिणाम झाला आहे. आता ही उपकरणे पाठविणे आव्हानात्मक असेल. ते सिंगापूर अथवा इतर देशांच्या मार्गाने पोहोचवले जाऊ शकतील. यामुळे ही अत्यंत आवश्यक असलेली उपकरणे पोहोचायला वेळ लागेल.