South China Sea मध्ये ड्रॅगनने ‘मानवी मलमूत्र’ फेकले, तज्ज्ञ म्हणतात हे धोकादायक आहे

कोरोनाव्हायरसमुळे जगभर टीकेचा सामना करणार्‍या चीन अद्यापही त्यांची कुटिल कारस्थाने थांबवायचं नाव घेत नाही. तो सतत नवीन युक्त्यांचा वापर करून आपल्या शेजारच्या देशांना त्रास देण्याचा आणि धमकावण्याचा प्रयत्न करीत आहे. आता जगासमोर चीनची एक नवीन करतूत समोर आली आहे.

  दक्षिण चीन समुद्राचे चीनमुळे होतोय खराब

  अमेरिकेच्या एका तज्ज्ञाने सोमवारी दावा केला की, चिनी जहाजांचा ताफा अनेक वर्षांपासून दक्षिण चीन समुद्रात मानवी मलमूत्र आणि सांडपाणी (Human Waste and Sewage) टाकत आहे. यामुळे कोरल रीफला हानी पोहचविणार्‍या दक्षिण चीन समुद्रात शैवाल तयार होत आहेत. कोरल रीफच्या मुळे येथे राहणाऱ्या माशांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.

  उपग्रह छायाचित्रांमुळे उघड झालाय डाव

  उपग्रह प्रतिमांच्या विश्लेषणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान बनविणारी कंपनी सिम्युलॅरिटी इंक (Simularity Inc) या कंपनीची उपकंपनी लिझ डेरर (Liz Derr) ने दिलेल्या माहितीनुसार की गेल्या पाच वर्षात जमलेल्या उपग्रह प्रतिमांमधून हे दिसून येते की मानवी उत्सर्जन, सांडपाणी आणि मलनिस्सारणाचे पाणी दक्षिण चीन समुद्रात कसे टाकले गेले आहे. हे स्प्राटलिझ प्रदेशात (Spratlys region) खडकांजवळ जमा झालेले आहे. ज्यामुळे या ठिकाणी शेवाळ तयार होते आहे.

  शेकडो चीनी जहाजांनी टाकलाय डेरा

  लिज डेरने सांगितले की, ड्रॅगन मानवी मलमूत्र तसेच सांडपाणीही समुद्रात फेकत आहे. गेल्या १७ जूनला, किमान २३६ चीनी जहाजे अटोलमध्ये दिसली, ती घाण टाकण्यासाठी आली होती. स्प्राटलीत लंगरलेली शेकडो जहाजेही हे ठिकाण काबीज करुन कचरा समुद्रात टाकत आहेत. जेव्हा जहाजे हलत नाहीत तेव्हा सांडपाण्याचा ढीग असतो. यामुळे हेच लक्षात येतं की, चीन किती मोठ्या प्रमाणात समुद्र घाण करीत आहे.

  तज्ज्ञांनी ही धक्कादायक बाब असल्याचे सांगितले

  लिज डेरच्या माहितीनुसार जेव्हा जहाजे त्यांच्या जागेवरुन सरकत नाहीत, तेव्हा त्या ठिकाणी कचरा, सांडपणी गोळा होण्यास सुरवात होते. Spratly मध्ये लंगरलेली शेकडो जहाजे खडकांवर सांडपाणी टाकत आहेत. यामुळे येथे राहणारे मासे मरतील आणि त्यामुळे मच्छीमारांच्या रोजीरोटीस धोका निर्माण होईल. यामुळे पर्यावरणाचेही मोठे नुकसान होऊ शकते असेही डेरने नमूद केले आहे. डेरने याला भयंकर घटना म्हटले आहे ज्याची भरपाई केली जाऊ शकत नाही.

  चीनचा स्पष्टीकरणास नकार

  या अहवालावर चीनने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. तथापि, यापूर्वी चिनी अधिकारी म्हणाले होते की, त्यांना दक्षिण चीन समुद्राबद्दल जाणीव आहे आणि त्या परिसरातील जलचर जीवनाचे संरक्षण करण्यासाठी अनेक पावले उचलली गेली आहेत. त्याचबरोबर फिलिपिन्सच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की ते चीनला विरोध करतील, परंतु त्याआधीच ते स्वतःच या अहवालाची पडताळणी करू इच्छितात. आपणाला ठाऊक की, दक्षिण चीन समुद्रावरून सुरुवातीपासूनच वाद सुरू आहे, ज्यामुळे तेथे इतर देश फारसे सक्रिय नाहीत. याचा फायदा घेत चीन तेथे प्रदूषण पसरवत आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर चीन सुधारत नसेल तर संपूर्ण परिसराचे पाणी खूप विषारी होईल, ज्यामुळे तेथील जलचर प्राण्यांचे अस्तित्वच संपेल.

  या बातमीबाबत तुम्हाला काय वाटते. कमेंट बॉक्समध्ये मांडा तुमचं मत…

  china dumping human waste sewage waste water in south china sea did not react on derrs assessment of the environmental damage nrvb