ड्रॅगनची नवी खेळी! नव्या तालिबान सरकारसाठी चीनकडून आर्थिक मदतीची घोषणा ; लसीही देणार ?

अफगाणिस्तानमधील अराजकता समाप्त करण्यासाठी आणि योग्य शासन व्यवस्था देण्यासाठी तालिबानला आर्थिक मदतीची गरज आहे. परंतु याच संधीचा फायदा घेत चीनने पुढाकार घेत तालिबानच्या नव्या सरकारशी हातमिळवणी केली आहे.

    बिजिंग: अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर अनेक प्रकारच्या भयावह घटना समोर येत आहेत. तालिबान्यांनी सत्ता मिळवल्यानंतर त्यांनी अफगाणिस्तानात सत्ता स्थापन केली. तालिबान्यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर जागतिक स्तरावर अद्यापही खळबळ दिसून आलेली नाहीये. परंतु नव्या तालिबान सरकारसाठी चीनकडून आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली असून लसीही देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

    ड्रॅगनची नवी खेळी ?

    नवीन तालिबान सरकारसाठी तब्बल ३१० लाख अमेरिकन डॉलरच्या मदतीची घोषणा केली आहे. तसेच चीन आर्थिक मदतीसह तालिबान सरकारला अन्नधान्य, औषधे, लसी, कपडे आणि लस याचीही मोठ्या प्रमाणावर मदत करणार असल्याचे सांगितले जात आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

    दरम्यान, अखेर अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सरकार स्थापन केले आहे. मुल्ला मोहम्मद हसन अखुंद अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारचे पंतप्रधान असतील. सिराज हक्कानीला गृहमंत्री, तर मुल्ला याकूबला संरक्षण मंत्री बनवण्यात आले आहे. अब्दुल गनी बरादर उपपंतप्रधान असतील. खैरउल्लाह खैरख्वा हे माहिती प्रसारण मंत्री असतील, अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येत आहे.