China is building two airports in Nepal; Trying to confuse India

लडाख सीमेवरून भारत - चीनचा वाद सुरू असला तरी चीनच्या भारतविरोधी कारवाया सीमेलगत दिसून येत आहेत. ज्या सीमांवर चीनचा अधिकार नाही त्या सीमांवरही चीन कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत आहे. काही दिवसांपूर्वी भारत-नेपाळ आणि भारत- तिबेट सीमेवर गावे वसवित असल्याचे तसेच सैन्य तैनातीही करीत असल्याचे उघड झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीन नेपाळ सीमेजवळील टिंगरी गावात विमानतळ उभारत आहे.

  बीजिंग : लडाख सीमेवरून भारत – चीनचा वाद सुरू असला तरी चीनच्या भारतविरोधी कारवाया सीमेलगत दिसून येत आहेत. ज्या सीमांवर चीनचा अधिकार नाही त्या सीमांवरही चीन कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत आहे. काही दिवसांपूर्वी भारत-नेपाळ आणि भारत- तिबेट सीमेवर गावे वसवित असल्याचे तसेच सैन्य तैनातीही करीत असल्याचे उघड झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीन नेपाळ सीमेजवळील टिंगरी गावात विमानतळ उभारत आहे.

  घुसखोरीची शंका

  टिंगरी हे गाव तिबेटच्या सीमेत असून हा परिसर संवेदनशील मानला जातो. येथून चीन, नेपाळ तर जवळ आहेच शिवाय सिक्किमचेही अंतर जवळपास 70 ते 80 किलोमीटर आहे. या भागात विमानतळ भारल्यास चीन नेपाळच नव्हे तर सिक्किमच्या सीमेतही घुसखोरी करण्याचा प्रयत्न करू शकतो.

  लडाखमध्ये लढाऊ विमानांचा सराव

  लडाख सीमेवर वर्षभरापासून तणाव कायम असतानाच चिनी वायुदलाने पुन्हा एकदा चिथावणी देणारे कृत्य केले आहे. या भागात चिनी वायुदलाने सर्वात मोठा सराव केला. या घटनेनंतर भारतीय सैन्यही सावध झाले असून चीनच्या प्रत्येक हालचालीवर पाळत ठेवण्यात येत आहे. सैन्य सरावात चीनच्या 21 ते 22 लढाऊ विमानांचा समावेश होता. यात जे-11 आणि एसयू 27 या श्रेणींच्या विमानांचा सहभाग होता.

  हे सुद्धा वाचा