चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता, जाणून घ्या कारण

लडाखच्या(ladakh) अतिक्रमण केलेल्या काही भागांमधून चिनी सैन्याने माघार घेतली आहे. मात्र अजूनही हा वाद पूर्णपणे मिटलेला नाही. या पार्श्वभूमीवर चीनने ब्रिक्स परिषद भारतामध्ये आयोजित करण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे.

    भारत-चीनमधील सीमावाद(India-china border issue) हळुहळू निवळत आहे. लडाखच्या(ladakh) अतिक्रमण केलेल्या काही भागांमधून चिनी सैन्याने माघार घेतली आहे. मात्र अजूनही हा वाद पूर्णपणे मिटलेला नाही. या पार्श्वभूमीवर चीनने ब्रिक्स परिषद भारतामध्ये आयोजित करण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. या परिषदेसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष भारतात येऊ शकतात.

    चीनने वेगवेगळया क्षेत्रामधील सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि ब्रिक्सच्या अन्य सदस्यांसह काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कोरोनाची परिस्थिती सुधारली तर या वर्षात ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येऊ शकतात.

    चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेनबिन यांनी म्हटले आहे की, भारतात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेच्या आयोजनाला आमचा पाठिंबा आहे. भारत आणि अन्य देशांसोबत विविध क्षेत्रात संपर्क आणि सहकार्य बळकट करण्यासाठी काम करण्याची आमची इच्छा आहे.