सीमेवरील कडाक्याच्या थंडीमुळे चिनी सैनिक हैराण, रोज बदलले जातायत फॉरवर्ड पोस्टवरचे जवान

कडाक्याची थंडी सहन न झाल्यामुळे चीनला रोजच्या रोज आपले सैनिक बदलावे लागत आहेत. चिनी सैनिकांना अशा कडाक्याच्या थंडीची सवय नाही. त्यामुळे कडाक्याच्या थंडीत चिनी सैनिक आजारी पडत आहेत. भारतीय सैनिकांना मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीत राहण्याची सवय असल्यामुळे ते प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाय रोवून उभे आहेत.

पूर्व लडाख परिसरातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (Actual Line of Control) भारत आणि चीनचे हजारो सैनिक तैनात करण्यात आले आहेत. मात्र कडाक्याच्या थंडीनं चिनी सैनिकांची अवस्था वाईट झाल्याचं कळतंय. चिनी सैन्याला ही अति कडाक्याची थंडी सहन होत नसून त्यांचे सैनिक आजारी पडत आहेत. त्यामुळे रोजच्या रोज सैनिकांना माघारी बोलवावं लागत असून त्यांच्या जागी नवे सैनिक पाठवले जात आहेत.

कडाक्याची थंडी सहन न झाल्यामुळे चीनला रोजच्या रोज आपले सैनिक बदलावे लागत आहेत. चिनी सैनिकांना अशा कडाक्याच्या थंडीची सवय नाही. त्यामुळे कडाक्याच्या थंडीत चिनी सैनिक आजारी पडत आहेत. भारतीय सैनिकांना मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीत राहण्याची सवय असल्यामुळे ते प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाय रोवून उभे आहेत.

थंडीशी सामना करण्याच्या बाबतीत भारतीय जवान हे चिनी जवानांच्या तुलनेत कैक पटीनं सक्षम असल्याचं यातून सिद्ध झालंय. भारतीय जवानांना वर्षानुवर्षं लडाख आणि सियाचीनमध्ये सीमांचं रक्षण करण्याची सवय आहे. सियाचीन हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक उंची असणारा प्रदेश आहे, जिथं वर्षानुवर्षं भारतीय जवान खडा पहारा देत असतात.

कांगावेखोर चीननं एप्रिल आणि मे महिन्यात सुमारे ६० हजार जवान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या परिसरात तैनात केले होते. या सैनिकांनी भारतीय हद्दीत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि अजूनही असे प्रकार घडत आहेत. याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताकडूनही तितकंच सैन्य तैनात करण्यात आलं आहे.