india and china

भारतासोबत सीमावादात अडकलेला चीन(India and china  dispute) आता देशात फुटीरतावाद्यांना चिथावणी देण्याची उघडपणे धमकी देत आहे.

बीजिंग: भारतासोबत सीमावादात अडकलेला चीन(India and china  dispute) आता देशात फुटीरतावाद्यांना चिथावणी देण्याची उघडपणे धमकी देत आहे. तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वू यांनी अलिकडेच चीनच्या नापाक मनसुब्यांचा पर्दाफाश केला. यावरून चीनचा संताप झाला आहे. आता या मुद्द्यावरून चीनने भारताला धमकी(china threatning India) दिली आहे.

चिनी सरकारचे मुखपत्र ग्लोबल टाइम्सने भारताला तैवान कार्ड खेळण्यापासून वाचून राहण्याचा सल्ला देताना, भारताने तैवानच्या स्वातंत्र्याचे समर्थन केल्यास चीन त्याच्या अनेक राज्यांमध्ये फुटीरतावाद्यांना समर्थन देईल असे म्हटले आहे. दरम्यान, चीन आधीपासूनच ईशान्येकडील राज्यांमध्ये फुटीरतावाद्यांना आणि उपद्रवी गटांना शस्त्रास्त्रे आणि पैसे पुरवत आला आहे. दुसरीकडे काश्मीरात तो पाकिस्तानी अजेंड्याचेही समर्थन करतो. बीजिंग फॉरेन स्टडीज युनिव्हर्सिटीच्या ॲकॅडमी ऑफ रीजनल ॲन्ड ग्लोबल गव्हर्नन्सचे ज्येष्ठ संशोधन सहकारी लॉंग शिंगचुन म्हणाले की, भारतातील अनेक माध्यमांनी तैवानच्या राष्ट्रीय दिवसाची जाहिरात दाखविली आणि एका वृत्तवाहिनीने तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वू यांची मुलाखत घेतल्याने तैवानमधील फुटीरतावाद्यांना मंच मिळाला आहे. यामुळे भारताच्या तैवान कार्डाला कसा प्रतिसाद द्यायचा याबद्दल चीनमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

भारताने चीनला पाठिंबा दर्शविला आणि तैवानच्या स्वातंत्र्याला पाठिंबा न दिल्याचा परिणाम असा झाला की चीन भारतातील फुटीरवादी शक्तींना समर्थन देत नाही. मात्र, तैवान आणि भारतचे फुटीरवादी समान वर्गातील आहेत, असेही लाँग शिंगचून म्हणाले. जर भारताने तैवान कार्ड खेळले तर, चीनही फुटीरतावादी कार्ड खेळू शकतो. मात्र भारतीय लष्कराने कोणत्याही परिस्थितींचा सामना करण्यास तयार असल्याचे जाहीर केले आहे.

जर भारत तैवान कार्ड खेळत असेल तर चीनदेखील भारतीय फुटीरतावादी कार्ड खेळू शकतो हे आपल्याला ठाऊक असले पाहिजे. भारतीय लष्करानेही अडीच फ्रंट युद्धाची तयारी करत असल्याचे म्हटले आहे. त्याचा संदर्भ पाकिस्तान, चीन आणि अंतर्गत बंडखोरीकडे आहे. अंतर्गत बंडखोरीमध्ये फुटीरतावादी आणि दहशतवाद्यांचा समावेश आहे. तैवानच्या स्वातंत्र्यास भारताने पाठिंबा दर्शविला तर चीन पूर्वोत्तरेकडील त्रिपुरा, मेघालय, मिझोरम, मणिपूर, आसाम आणि नागालँड या राज्यांमध्ये फुटीरतावादी ताकदीला पाठिंबा देऊ शकतो. चीन सिक्कीममधील बंडालाही पाठिंबा देऊ शकतो. देशाच्या स्वातंत्र्यानंतर बरीच राज्ये जोडलेली आहेत, पण इथले लोक स्वत: ला भारतीय मानत नाहीत. त्यांना त्यांचा स्वतःचा देश हवा आहे आणि त्यासाठी ते लढा देत आहेत. यात प्रमुख आहे आसाम युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट. भारतीय सैन्याच्या मोहिमांमुळे या सशस्त्र फुटीरतावादी संघटना कमकुवत झाल्या आहेत, परंतु पूर्णपणे नष्ट झालेल्या नाहीत.

तैवानवर कब्जा करण्याचा डाव

तिबेटप्रमाणेच चीन तैवानवरही कब्जा करण्याच्या प्रयत्नात आहे. पण आपण स्वतंत्र देश आहोत हा संदेश तैवान जगाला देत आला आहे. यासाठी तैवानच्या अध्यक्षांनी आणि इतर नेत्यांनी अनेकदा भारताचे कौतुक केले आहे आणि पाठिंबा मागितला आहे. यातूनच तैवानने चीनची पोलखोल केली. चीन आपल्या आर्थिक घडीचा उपयोग करून इतर देशांवर कब्जा करत असल्याचा आरोप तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वू यांनी यांनी केला होता.