China's new plan to harass neighboring countries, including India, will change the climate 'in this way'

भारतासह शेजारी देशांना त्रास देण्यासाठी आखण्यात आलेल्या योजनेला अंमलात आणण्यासाठी चीनने अब्जावधी निधीची तरतूद केली आहे. या योजनेत चीन रासायनिक रॉकेटचा अवकाशात स्फोट घडवून आणणार आहे. यामुळे हवामान बदल होऊन अतीवृष्टी आणि अतीहिमवृष्टी होईल.

बीजिंग : चीन भारतासह शेजारी देशांमध्ये सीमाविस्तार करण्याच्या धोरणावर ठाम असल्याचे दिसत आहे. आपल्या शेजारी देशांवर चीन सतत आक्रमक भूमिका घेतच आहे. आता भारतासह शेजारी देशांना छळण्यासाठी चीनने नवी योजना आखली आहे. या योजनेत रासायनिक रॉकेटचा वापर करुन हवामानात बदल करण्याच्या डाव आहे. यासाठी चीनी सरकारने अब्जावधींच्या निधीची तरतूदही केली आहे.

काय आहे योजना जाणून घ्या

भारतासह शेजारी देशांना त्रास देण्यासाठी आखण्यात आलेल्या योजनेला अंमलात आणण्यासाठी चीनने अब्जावधी निधीची तरतूद केली आहे. या योजनेत चीन रासायनिक रॉकेटचा अवकाशात स्फोट घडवून आणणार आहे. यामुळे हवामान बदल होऊन अतीवृष्टी आणि अतीहिमवृष्टी होईल. मोठे महापूराचे लोंढे तयार करण्याचा डाव चीनने आखला असल्याचे समजते आहे. या योजनेतून चीनपासून ५५ लाख चौरस किलोमीटरपर्यंतच्या परिसरात २०२५ पर्यंत हवामानात बदल घडवण्याचा षडयंत्र रचले आहे. चीनचा हा मनसुबा उलटण्यासाठी चीनचे प्रचंड आर्थिक नुकसान किंवा चीनपुढे नवीन आव्हाने उभी करण्याचा मार्ग चीन सरकारच्या विरोधकांच्या हाती आहे.

अवकाशात हवामान बदल करुन अतीवृष्टी किंवा अतीहिमवृष्टी करण्यासाठीचे तंत्र विकसित आहे. बाष्पयुक्त ढगांवर सिल्व्हर आयोडाइड फवारल्यास त्या ढगांतून पाऊस सुरु होतो. तसेच ज्या भागात हिमवृष्टी होते तेथील ढगांवर सिल्व्हर आयोडाइड फवारल्यास त्या ढगांतून अतीहिमवृष्टी होते. चीनला याच तंत्राचा अतिवापर करुन अतीवृष्टी आणि अतीहिमवृष्टी करण्याचा मनसुबा आहे.

हवामानात कृत्रिमरित्या बदल करुन पाऊस पाडण्यासाठी भारतासह चीन, अमेरिका या देशांनी अशा प्रकारच्या प्रकल्पात गुंतवणूक केली आहे. परंतु कोणत्याही देशाला या तंत्रापासून अधिक फायदा झाल्याचे निदर्शनास आले नाही. तरिही चीननी शेजारी देशांना त्रास देण्यासाठी अब्जावधी रुपयांच गुंतवणूक केली आहे.

चीनच्या शिनजियांग प्रांतात चीनने कृत्रिमरित्या पाऊस पाडून शेतीचे उत्पन्न वाढविले. हा प्रकल्प यशस्वी झाल्याने चीन आता यामध्ये अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करत आहे. यामुळे चीनला या प्रकल्पामध्ये यश लाभले तर हवामानाच्या परिस्थिती मोठा बदल होईल. असे झाल्यास पृथ्वीवरील समतोल बिघडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. असा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तवला आहे.