China's provocative move; China's 20 new camps on LAC

लडाख :  पूर्व लडाखमध्ये मे महिन्यापासून भारत आणि चीनमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषे (एलएसी) तणावाची स्थिती आहे. दोन्ही देशांच्या सैन्याने एलएसीजवळ मोठ्या संख्येने सैनिक तैनात केले आहेत.

हा तणाव दूर करण्यासाठी दोन्ही बाजूंनी चर्चेच्या बऱ्याच फेऱ्या झाल्या. पण त्यातून कुठलाही तोडगा अद्याप निघू शकलेला नाही. अशातच डोकलाम वादाच्या वेळी भारतीय लष्कराने चिनी सैन्यासमोर मोठे आव्हान उभे केले होते. यातून धडा घेत चिनी सैन्याने आता आपली बाजू अधिक बळकट करण्यास सुरवात केली आहे. चिनी सैन्याने भारतीय सैन्याविरूद्ध आपली तयारी सुधारण्यासाठी एलएसीजवळ २० मिलिट्री कॅम्प बांधल्याची नवी माहिती समोर आली आहे.

भारताशी सुरू असलेल्या तणावानंतर हे चिनी सैन्याने हे मिलिट्री कॅम्प बांधले आहेत. या कॅम्पमध्ये सैन्याशी संबंधित सर्व आवश्‍यक वस्तू ठेवल्या आहेत, अशी माहिती एका उच्च सरकारी अधिकाऱ्याने दिली. लडाखमध्ये भारतीय सीमेजवळ चीनकडून सुरू असलेल्या बांधकामावर अमेरिकेच्या संसदेतील एका सदस्याने चिंता व्यक्त केली आहे. यात तथ्य असेल तर ही चीनची चिथावणीखोर चाल आहे आणि दक्षिण चीन समुद्रात सुरू असलेल्या हालचालींप्रमाणेच आहे, असे ते म्हणाले.