चीनचे धाबे दणाणले ; अमेरिकेने F-35 A लढाऊ विमानातून केला ‘अणुबॉम्ब’ डागण्याचा सराव

F-35 A हे अमेरिकेचे पाचव्या पीढीचे फायटर विमान आहे. जगातील शक्तिशाली, अत्याधुनिक फायटर जेटमध्ये या विमानाचा समावेश होतो. याच छुप्या तांत्रिक लढाऊ विमान F -35 A वरून अणुबॉम्ब डागण्याचा सराव अमेरिकेने केला आहे.

F-35 A हे अमेरिकेचे पाचव्या पीढीचे फायटर विमान आहे. जगातील शक्तिशाली, अत्याधुनिक फायटर जेटमध्ये या विमानाचा समावेश होतो. याच छुप्या तांत्रिक लढाऊ विमान F -35 A वरून अणुबॉम्ब डागण्याचा सराव अमेरिकेने केला आहे. युनायटेड स्टेट्स एअर फोर्सने (यूएसएएफ) लढाऊ विमानातून B 61-12 अणुबॉम्ब खाली पाडण्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. तेव्हापासून अमेरिकेचा शत्रू नंबर एक चीन घाबरून गेला आहे. चिनी सैन्याच्या अधिकृत वेबसाइट इंग्लिश चाइनामिल डॉट कॉम डॉट सीएनवर प्रसिद्ध झालेल्या लेखात ड्रॅगनने या चाचणीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

चिनी सैन्य अमेरिकेच्या आण्विक सामर्थ्याने घाबरला
चिनी सैन्याने या लेखात म्हटले आहे की या चाचणीनंतर अमेरिकेकडे अणु हल्ला करण्याची क्षमता वाढली आहे. अमेरिकन सैन्य छोटे अणुबॉम्ब विकसित करीत आहे. यामुळे यूएस लष्कराला समुद्र, हवा किंवा भूमीवर प्रभावीपणे शत्रूविरूद्ध कारवाई करण्याचे सामर्थ्य मिळेल. F -36 A लढाऊ विमान त्वरीत कोणताही रडार पकडत नाही. यामुळे अमेरिकेला अत्याधुनिक लढाऊ क्षमता आणि प्रगत हवाई संरक्षण प्रणालींविरूद्ध घुसखोरी करणे सहज शक्य होईल.

अमेरिकेने २५ ऑगस्ट रोज चाचणी केली
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार अमेरिकेने नेवाड्यातील टोनोपा टेस्ट रेंज येथे यावर्षी २५ ऑगस्ट रोजी ही अणुचाचणी घेतली. अमेरिकेच्या बर्‍याच तज्ञांनी ही चाचणी अमेरिकन सैन्याने आण्विक शस्त्रे तैनात करण्याचे मोठे पाऊल म्हटले आहे. या चाचणीत, रेडिएशन नसलेल्या साहित्याने बनलेला B 61 -12 अणुबॉम्ब अमेरिकन F -35 A लढाऊ विमानाद्वारे सिम्युलेटेड लक्ष्यावर सोडण्यात आले.