कोरोनावरील लसीबाबत चिनी कंपनीचा दावा, ‘या’ वर्षात तयार होणार लस?

कोरोनावरील लसीबाबत चिनी कंपनीने (chinese company claims about corona vaccine)  एक मोठा दावा केला आहे. चिनी कंपनीने म्हटलं आहे की, २०२१ या वर्षाच्या सुरूवातीलाच कोरोनावरील लस तयार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेसह (USA) जगभरात कोरोनावरील लस वितरणासाठी तयार असेल अशी माहिती चिनी औषध उत्पादक कंपनी सिनोवॅकनं दिली आहे.

कोरोना विषाणूचा  (corona virus) प्रादुर्भाव संपूर्ण जगभरात मोठ्या संख्येने होत आहे. तसेच जगभरातील (all over the world ) कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येनं ३ कोटींचा टप्पा ( crosses 3 crore ) ओलांडला असून लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यूही ( deaths due to corona virus) झाला आहे. यादरम्यान अनेक देशांमध्ये कोरोनावरील लस विकसित करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न (progress is going on) सुरू आहेत.

मात्र, कोरोनावरील लसीबाबत चिनी कंपनीने (chinese company claims about corona vaccine)  एक मोठा दावा केला आहे. चिनी कंपनीने म्हटलं आहे की, २०२१ या वर्षाच्या सुरूवातीलाच कोरोनावरील लस तयार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेसह (USA) जगभरात कोरोनावरील लस वितरणासाठी तयार असेल अशी माहिती चिनी औषध उत्पादक कंपनी सिनोवॅकनं दिली आहे.

अमेरिका, भारत, ब्राझील या देशांना करोना विषाणूचा सर्वाधिक फटका बसला आहे. सिनोवॅक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यीन वीडोंग यांनी याबाबत माहिती दिली. चीनमध्ये कोरोनावर विकसित होणारी लस तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मानवी चाचणीसाठी तयार आहे. जर ‘कोरोनावॅक’ लस तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मानवी चाचणीत यशस्वी झाली तर त्या लसीची अमेरिकेत विक्री करण्यास अमेरिकेतील आरोग्य नियामक मंडळ ‘यूएस फूड अँड ड्रग अॅ़डमिनिस्ट्रेशन’कडे परवानगीसाठी अर्ज केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.