धक्कादायक! बद्धकोष्ठतेचा जाणवू लागला त्रास, तो असह्य झाल्याने व्यक्तीने केलं असं काम पण उपाय बेतला जीवावर; जाणून घ्या सविस्तर

पोटदुखी असहय झाल्यानंतर त्याने रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर डॉक्टरांनी तातडीने तपासणी करून शस्त्रक्रिया केली आणि त्याचे प्राण वाचवले. हा जिवंत मासा आतड्यांमधून पोटात गेला होता. जवळपास एक आठवडा हा मासा त्या चिनी व्यक्तीच्या पोटात होता.

    बीजिंग : मुळव्याध (Hemorrhoids), बद्धकोष्ठता (constipation) आदी कारणांमुळे अनेकजण त्रस्त असतात. डॉक्टरांच्या मार्गदशर्नाने औषधोपचार सुरू असताना घरगुती उपचारावरही अनेकजण भर देतात. मात्र, चीनमध्ये एका व्यक्तीने भलताच उपाय केला. बद्धकोष्ठतेने त्रासलेल्या या व्यक्तीने आपल्या गुदाशयात २० सेंटीमीटर म्हणजे जवळपास आठ इंच लांब असलेला जिवंत ईल मासा टाकला. हा ईल मासा पोटात अडकला. पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्याने रुग्णालयात धाव घेतली. या विचित्रपणामुळे ती व्यक्ती मरणाच्या दारात पोहचली होती. मात्र, तातडीने केलेल्या उपचारामुळे या व्यक्तीचे प्राण वाचले.

    ‘Global Times’ने दिलेल्या वृत्तानुसार, या चिनी रुग्णास सुरुवातीला डॉक्टरांकडे जाण्यास भीती वाटत होती. मात्र, पोटदुखी असह्य झाल्यानंतर त्याने रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर डॉक्टरांनी तातडीने तपासणी करून शस्त्रक्रिया केली आणि त्याचे प्राण वाचवले. हा जिवंत मासा आतड्यांमधून पोटात गेला होता. जवळपास एक आठवडा हा मासा त्या चिनी व्यक्तीच्या पोटात होता. पोटदुखीचा त्रास प्रचंड वाढल्यानंतर गुआंगडोंग प्रांतातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मासा पोटात गेल्याने शरीरातील अंतर्गत भागाचेही नुकसान झाले होते.

    रुग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी रुग्णावर शस्त्रक्रिया केली आणि त्याच्या पोटातील जिवंत मासा बाहेर काढला. या रुग्णाचे हेमोलिसिसमुळे प्राण गेले असते, असे डॉक्टरांनी म्हटले. लाल रक्तपेशी नष्ट झाल्यानंतर हेमोलिसिसचा आजार होतो. मोठ्या आतड्याद्वारे विषाणू पोटापर्यंत पोहचल्यानंतर लाल रक्तपेशी कमी होण्याचा धोका निर्माण होतो.

    जिवंत मासा गुदाशयात सोडल्यास बद्धकोष्ठता दूर होते, याबाबत कोणताही ठोस पुरावा नाही. याआधीदेखील मागील वर्षी एका चिनी व्यक्तीने १६ इंच लांब मासा आपल्या गुदाशयात टाकला होता.

    chinese man inserted eel into his rectum to relieve constipation know the full story details