चंद्राच्या पृष्ठभागाला चिनी नावे; आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेची मान्यता

आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेने (आयएयू) चंद्रावरील आठ भागांना चिनी नावे ठेवण्याची मान्यता दिली आहे. चिनी अंतराळ यान 'चांग ई-5' गेल्यावर्षी याच ठिकाणी उतरले होते. हे यान चंद्रावरील पृष्ठभागाचे नमूने गोळा करुन पृथ्वीवर परतले होते. 'चांग ई-5' अंतराळ मोहीम ही चंद्रावरील नमुने गोळा करण्याचा चीनचा पहिला उपक्रम होता. अमेरिकेने चंद्रावरील नमुने गोळा करण्याच्या 40 वर्षांहून अधिक काळानंतर चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने आणण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता.

    बीजिंग : आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेने (आयएयू) चंद्रावरील आठ भागांना चिनी नावे ठेवण्याची मान्यता दिली आहे. चिनी अंतराळ यान ‘चांग ई-5’ गेल्यावर्षी याच ठिकाणी उतरले होते. हे यान चंद्रावरील पृष्ठभागाचे नमूने गोळा करुन पृथ्वीवर परतले होते. ‘चांग ई-5’ अंतराळ मोहीम ही चंद्रावरील नमुने गोळा करण्याचा चीनचा पहिला उपक्रम होता. अमेरिकेने चंद्रावरील नमुने गोळा करण्याच्या 40 वर्षांहून अधिक काळानंतर चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने आणण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता.

    चंद्रावरील पृष्ठभागाचे नामकरण करण्याकरिता आयएयूच्या कार्यकारी गटाने ‘चांग ई -5’ ज्या ठिकाणी उतरले त्या जागेच्या आसपासच्या आठ ठिकाणांची नावे देण्यास परवानगी दिली आहे. मॉन्स हुआ, मॉन्स हेंग, पै शिउ, लियाओ हुई, साँग यिंगक्सिंग, स्टॅटिओ टियानचुआन आणि शु ग्वानकी अशी ही नावे आहेत. अधिक माहितीसाठी, ग्रहांच्या नामांकन राजपत्रात एलएसी -23 नकाशा पाहा, असे आयएयूने म्हटले आहे.

    चीन 2010 पासून चंद्रावरील भौगोलिक प्रदेशांना नावे देत आहे. अधिकृत माध्यमांनुसार, सप्टेंबर 2010 मध्ये चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने चंद्रावरील पृष्ठभाग अधिक जवळून जाणून घेता यावा याकरीता चंद्रावरील ठिकाणांना अधिकृत चीनी नावे प्रकाशित केली होती. मंत्रालयाने 468 ठिकाणांची चिनी नावे प्रकाशित केली होती, त्यानंतर चिनी सरकारच्या मुखपत्रातून फेब्रुवारी 2019 मध्ये चंद्रावरील आणखी पाच भौगोलिक स्थानांना चिनी नावे देण्याची पुष्टी करण्यात आली होती. ही नावे ‘चांग ई -4’ मोहिमेनंतर जाहीर करण्यात आली.

    हे सुद्धा वाचा