googles new truecaller like verified calls feature will tell you why a someone is calling you

शाळांमध्ये मोबाईल फोन नेण्यास बऱ्याच ठिकाणी परवानगी नसते. शाळेत मोबाईल आणल्यास अनेक शाळांमध्ये शिक्षा केली जाते. चीनमधल्या एका शाळेत तर मोबाईल नेल्यास खूपच कठीण शिक्षा करते.(Chinese students are forced to smashed their mobile if it is brought in school)

बिजींग: शाळांमध्ये मोबाईल फोन नेण्यास बऱ्याच ठिकाणी परवानगी नसते. शाळेत मोबाईल आणल्यास अनेक शाळांमध्ये शिक्षा केली जाते. चीनमधल्या एका शाळेत तर मोबाईल नेल्यास खूपच कठीण शिक्षा करते.(Chinese students are forced to smashed their mobile if it is brought in school)

चीनमधील एक शाळा विद्यार्थी कॅम्पसमध्ये मोबाईल किंवा इतर डिव्हाईस आणत असल्याचे आढळल्यास त्यांना ते फोन जमिनीवर आपटून फोडायला सांगते. या संदर्भातला एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. दक्षिण-पश्चिम चीनच्या युन्नान प्रांतातील मेंगझी शहरातील एका अज्ञात शाळेचा हा व्हिडिओ असल्याचे म्हटले जात आहे.

या व्हिडीओनुसार, कॅम्पसमध्ये फोन आणताना पकडले गेल्यानंतर विद्यार्थ्यांना शिक्षा करण्यात आली. फुटेजमध्ये तीन मुली रांगेत त्यांचे फोन घेऊन उभ्या असल्याचे दिसत आहे तर एक वयस्क महिला जी त्यांची शिक्षिका असू शकते, ही महिला त्यांना जमिनीवर त्यांचे फोन आपटून फोडण्याची ऑर्डर देताना दिसते. तर विद्यार्थिनी नाखूषीने सावकाश त्यांचे हँडसेट जमिनीवर टाकताना दिसत आहेत.

दरम्यान या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे समजते. काही नेटिझन्सन शाळेच्या दृष्टिकोनाशी सहमत झाले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. तर काहींनी विद्यार्थ्यांच्या हक्काबाबत विचारणा केली आहे.