हे फळ इतकं विषारी आहे की, खाल्ल्यास तुमची रवानगी थेट यमसदनीच, जाणून घ्या सविस्तर

ख्रिस्तोफर कोलंबसने 'मैशीनील'च्या फळाला मृत्यूचा छोटा सफरचंद असे नाव दिले. हे इतके विषारी आहे की, नुसते खाल्यामुळेच नाही तर, या झाडाचा रस जरी एखाद्याच्या डोळ्यांत उडाला तरी तो, त्याला आंधळा करु शकतो.

    फ्लोरिडा : विषारी हवा, विषारी पाणी याबद्दलं आपण सर्वांनीच ऐकले आहे. परंतु तुम्हाला हे माहित आहे का? की एक विषारी (poison) झाड देखील या जगात आहे. या झाडाचे नाव ‘मैशीनील’ असे आहे. हे फ्लोरिडा (Florida) आणि कॅरिबियन समुद्राच्या (Caribbean Sea) किनारपट्टीवर आढळते. असे म्हटले जाते की, ते इतके विषारी आहे की, त्याच्या नुसत्या संपर्कात येताच माणसाच्या शरीरावर फोड यायला सुरवात होतात. या झाडाला फळं देखील येतात जी दिसायला सफरचंदासारखी दिसतात.

    शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की, या रसाळ फळाचा एक तुकडा खाल्याने देखील माणसाचा मृत्यू होऊ शकतो. परंतु असे असले तरी, शास्त्रज्ञांनी या फळाचा स्वाद घेतला आहे.

    असे म्हटले जाते की, ख्रिस्तोफर कोलंबसने (christopher columbus) ‘मैशीनील’च्या फळाला मृत्यूचा छोटा सफरचंद असे नाव दिले. हे इतके विषारी आहे की, नुसते खाल्यामुळेच नाही तर, या झाडाचा रस जरी एखाद्याच्या डोळ्यांत उडाला तरी तो, त्याला आंधळा करु शकतो.

    पावसापासून वाचण्यासाठी किंवा उन्हापासून वाचण्यासाठी जर कोणता माणूस उभा राहिला तरी, त्याला याचे मोठे नुकसान होऊ शकते. निकोला एच स्ट्रिकलँड नावाच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, एकदा त्यांनी आणि त्यांच्या काही मित्रांनी टोबॅगोच्या कॅरिबियन बेटाच्या किनाऱ्यावर हे फळ खाल्ले, होते जे फारच कडू होते.

    त्यांनी सांगितले की, या झाडाचे फळ खाल्ल्यानंतर त्यांना जळजळ होऊ लागली आणि शरीराला सूज येऊ लागली. मात्र, तातडीने त्यांनी उपचार केल्यामुळे त्यांची प्रकृती सुधारली.

    लोकांना त्या झाडापासून लांब ठेवण्यासाठी आणि त्याचे फळ खाण्यापासून रोखण्यासाठी या झाडाच्या आजूबाजूला फलक लावण्यात आले आहेत, ज्यावर या झाडाचे फळ न खाण्याचा इशारा दिला गेला आहे. ‘मैशीनील’ या झाडाची उंची सुमारे ५० फूट आहे.

    झाडाचे फळ सर्वात विषारी

    या झाडाची पाने अंडाकृती आणि चमकदार आहेत आणि या झाडाचा सर्वात विषारी भाग म्हणजे याचे फळं आहे. ज्यामुळे हे झाड लोकांना त्याच्याकडे आकर्षित करते.

    परंतु असे असले तरी स्थानिक परिस्थितीमध्ये या झाडाची अत्यंत महत्वाची भूमिका आहे. या झाडाची समुद्राच्या किनाऱ्यावरील मातीची धूप रोखण्यासाठी या महत्त्वाची भूमिका आहे. या झाडांची मुळं त्यांच्या सभोवतालातील मातीला पकडून ठेवतात. यामुळेच या झाडाला त्या ठिकाणावरुन काढले जात नाही.

    कॅरिबियन सुतार या झाडांचा वापर करतात

    शतकानुशतके फर्निचर बनवण्यासाठी कॅरिबियन सुतारही या झाडाचा वापर करत आहेत. कारण या झाडाचं लाकूड हे टिकाऊ आहे. परंतु यासाठी या झाडाला अत्यंत काळजीपूर्वक कापले जाते. त्याचबरोबर यातील विषारी रस काढून टाकण्यासाठी कापल्यानंतर या झाडाची लाकडं उन्हात बराच काळ वाळवली जातात. त्यानंतर या लाकडांचा उपयोग फर्निचर तयार करण्यासाठी केला जातो.

    christopher columbus says do not eat this poisonous apple because small apple is more dangerous to our health