हवामान बदल ठरले वृद्धांच्या मृत्यूचे कारण, लॅन्सेट काउंटडाऊनच्या अहवालातील दावा

कीकडे कोरोना व्हायरस (corona virus)  जगात विनाश आणत आहे तर, दुसरीकडे हवामान बदलदेखील दिवसेंदिवस प्राणघातक (Dangerous) ठरत आहेत. नुकत्याच एका अहवालात (Report) असा दावा केला गेला आहे की, गेल्या २ दशकांत उष्मामुळे झालेल्या उष्ण हवामानामुळे वृद्धांच्या मृत्यूंमध्ये (Deaths) सुमारे ५४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

न्यूयॉर्क : जगभरातील बऱ्याच ठिकाणी उष्णता व दुष्काळाच्या घटनाही वाढत आहेत. यामुळे जंगलातील (Jungle) वणवा, धूर (Smoke) आणि ज्वलन (Combustion) यामुळे लोकांचे फुफ्फुसे खराब होऊन मृत्यू (Death) होत आहे. हा अहवाल तयार करणाऱ्या संशोधकांचे म्हणणे आहे की, कोविड-१९ महामारी हवामान (Environmental Changes) बदलासाठी महत्त्वपूर्ण सिद्ध होऊ शकते.

एकीकडे कोरोना व्हायरस (corona virus)  जगात विनाश आणत आहे तर, दुसरीकडे हवामान बदलदेखील दिवसेंदिवस प्राणघातक (Dangerous) ठरत आहेत. नुकत्याच एका अहवालात असा दावा केला गेला आहे की, गेल्या २ दशकांत उष्मामुळे झालेल्या उष्ण हवामानामुळे वृद्धांच्या मृत्यूंमध्ये सुमारे ५४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा दावा लॅन्सेट काउंटडाऊन अहवालात करण्यात आला आहे.

सर्वात चिंताजनक अहवाल

लॅन्सेट काउंटडाऊन अहवालात हवामानातील बदल आणि मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांवर संशोधन प्रकाशित करण्यात येते. हा वार्षिक अहवाल आरोग्य आणि हवामान बदलांच्या ४० माप दंडांवर संशोधन केल्यानंतर तयार होतो. या वर्षाचा अहवाल आतापर्यंतचा सर्वांत चिंताजनक अहवाल असल्याचे म्हटले जात आहे.
कोळसा जाळल्यामुळे मृत्यू

उष्ण हवामानाशी संबंधित कारणास्तव जगभरात २०१८ मध्ये २.९६ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. २०१८ मध्ये कोळसा जळाल्यापासून पीएम २.५ प्रदूषक सोडल्यामुळे ५०.००० मृत्यू झाले. ही अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे. कारण केवळ भारतासारख्या देशांमध्येच दरवर्षी सुमारे ५ लाख लोक प्रदूषणासंबंधित समस्यांमुळे मृत्यूमुखी पडतात. यापैकी जवळपास १ लाख लोकांचा उद्योग, घरे आणि वीज प्रकल्पात कोळसा जाळल्यामुळे मृत्यू होतो.