वृद्धाच्या डोक्यावर ओतलं कोल्डड्रिंक, मारले बुक्के…हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणं कठीण होईल

न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या माहितीनुसार एक ८३ वर्षीय आजोबा बार्नेस एव्हेन्युवर उतरत होते. त्याचवेळी त्यांचं एका तरुणाशी भांडण झालं. हा वाद वाढत गेला. तो इतका वाढला की त्या तरुणानं हातातील थंड पेयाची बाटली त्या आजोबांच्या डोक्यावर ओतली आणि त्यांना बुक्के मारले.

    काही माणसं अतिशाहणी असतात. त्यांना इतरांशी कसा व्यवहार करावा याची अजिबात बुद्धी नसते. ही माणसं मग समरोच्याचे वय काहीही असो त्याचा विचार न करता चुकीचे वागतात. त्यांचा अपमान करतात. अशीच एका तरुणाची वर्तणूक समोर आली आहे. या तरुणाने एका वृद्धाचा अत्यंत घाणेरड्या पद्धतीने अपमान केला आहे. हा व्हिडिओ पाहताच तुम्हालाही राग आवरणार नाही.

    न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या माहितीनुसार एक ८३ वर्षीय आजोबा बार्नेस एव्हेन्युवर उतरत होते. त्याचवेळी त्यांचं एका तरुणाशी भांडण झालं. हा वाद वाढत गेला. तो इतका वाढला की त्या तरुणानं हातातील थंड पेयाची बाटली त्या आजोबांच्या डोक्यावर ओतली आणि त्यांना बुक्के मारले. न्युयॉर्कच्या पोलिस डिपार्टमेंटने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात सर्व काही स्पष्ट दिसत आहे. या तरुणाचे वृद्धासोबत केलेले वर्तन पाहून तुम्हालाही राग येईल. हा तरुण सध्या फरार आहे. पोलिसांनी या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तसे म्हटले आहे. पोलीस सध्या या तरुणाचा शोध घेत आहेत. दरम्यान या आजोबांना भरपूर मार लागला आहे आणि ते रुग्णालयात उपचार घेत आहेत.

    cold drink poured old mans head you too will be angry after watching video