अमेरिकेत थंडीचा कहर, जागोजागी नागरिकांचे बळी, बर्फ उकळून काढतायत दिवस

गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे आणि थंडीच्या कडाक्यामुळे अन्न मिळवण्यासाठी रांगेत नागरिक उभं राहिल्याचं चित्र दिसत होतं. ते चित्र यंदाही दिसू लागलंय. यंदा तर काही आठवडे अगोदरच थंडीने कहर करायला सुरुवात केलीय. बर्फाच्या वादळांमुळे अनेक ठिकाणी वीजेच्या तारा तुटल्या असून गेल्या पाच दिवसांपासून अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झालाय. 

    जगातील महासत्ता असलेल्या अमेरिकेत सध्या थंडीनं कहर केलाय. अनेक ठिकाणी बर्फांची वादळं येत असल्यामुळे नागरिकांचं जगणं मुश्किल झालंय. या वादळांमुळे अनेक ठिकाणी तांत्रिक समस्या उभ्या राहत असून नागरिकांच्या जीवावर ही थंडी उठू लागल्याचं चित्र आता दिसू लागलंय.

    गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे आणि थंडीच्या कडाक्यामुळे अन्न मिळवण्यासाठी रांगेत नागरिक उभं राहिल्याचं चित्र दिसत होतं. ते चित्र यंदाही दिसू लागलंय. यंदा तर काही आठवडे अगोदरच थंडीने कहर करायला सुरुवात केलीय. बर्फाच्या वादळांमुळे अनेक ठिकाणी वीजेच्या तारा तुटल्या असून गेल्या पाच दिवसांपासून अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झालाय.

    घरोघरी बसवण्यात आलेल्या हिटरमुळे नागरिकांचा कडाक्याच्या थंडीपासून बचाव होत असतो. मात्र विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक घरांतील हिटर बंद पडले आणि नागरिक कडाक्याच्या थंडीच्या कचाट्यात सापडले आहेत. अनेक नागरिकांनी स्वतःला घरात तर अनेकांनी स्वतःला त्यांच्या कारमध्ये कोंडून घेतलं. मात्र त्यामुळे कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण वाढून अनेक नागरिकांचा त्यात मृत्यू झाला. ओहियोसह इतर राज्यांत मिळून आतापर्यंत ५८ जणांचे आतापर्यंत प्राण गेले आहेत.

    तर टेक्सासमध्ये पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यामुळे पाणीपुरवठा खंडित झालाय. त्यामुळे नागरिकांना सध्या बर्फ उकळून पाणी प्यावं लागत आहे. टेक्सासमध्ये साधारण ३ कोटी लोकसंख्या आहे. त्यापैकी निम्म्या लोकसंख्येला सध्या पाणीपुरवठा होत नसल्याचं चित्र आहे. हूस्टन स्टेडिअमबाहेर अनेक नागरिकांनी एक बाटली पाणी मिळवण्यासाठी गर्दी केल्याचं चित्र दिसत होतं.