अभिमास्पद! ॲमेझोनचे संस्थापक बेझोस यांच्या अंतराळ सफरीच्या स्वप्नपूर्तीत कल्याणच्या कन्येचे योगदान ; जाणून घ्या संजल गावंडेबाबत

ब्लू ओरिजिनचे अवकाश रॉकेट बनवणाऱ्या संघात महाराष्ट्रातील कल्याण येथील रहिवासी ३० वर्षीय संजल गावंडे हीचा सहभाग आहे. ब्लू ओरिजिनचा न्यू शेपर्ड रॉकेट बनवणाऱ्या टीमचा ती भाग आहे. कमर्शियल स्पेसफ्लाइट कंपनीत सिस्टीम इंजिनिअर असलेल्या संजलने मुंबई विद्यापीठातून यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी घेतली आहे.

    अ‌ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस आज अंतराळ प्रवास करणार आहेत. जेफ बेजोस यांनी ब्ल्यू ओरिजिन नावाची स्पेस कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून जेफ बेजोस यांनी अंतराळ पर्यटनाची घोषणा मागील महिन्यात केली होती. या कंपनीच्या स्पेसक्राफ्टमधून अंतराळ दर्शन घडवण्यात येणार आहे. कंपनीकडून पाठवण्यात येणाऱ्या पहिल्या मानवसहित स्पेसक्राप्टमध्ये ते असणार आहेत.जेफ बेजोसने आपल्या स्पेसक्राफ्टला एनएस-१४ नाव दिलं आहे. या स्पेस क्राफ्टचं चाचणी यशस्वी झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेण्यात आला आहे. जेफ बेजोस अंतराळात जाणारे पहिले श्रीमंत व्यक्ती ठरणार आहेत. याबाबत जेव्हा बेझोस यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले, “वयाच्या ५ व्या वर्षांपासून माझे अंतराळात जाण्याचे स्वप्न होते . आज ते स्वप्न पूर्ण होत असून हे माझ्या आयुष्यातील ‘ग्रेट ॲडव्हेंचर’ ठरणार आहे”. मात्र अनेकांना माहित नसेल की बेझोस यांच्या स्वप्नपूर्तीला महाराष्ट्राच्या कल्याणच्या मुलीचा हातभार आहे.

    कोण आहे संकुल गावंडे?
    ब्लू ओरिजिनचे अवकाश रॉकेट बनवणाऱ्या संघात महाराष्ट्रातील कल्याण येथील रहिवासी ३० वर्षीय संजल गावंडे हीचा सहभाग आहे. ब्लू ओरिजिनचा न्यू शेपर्ड रॉकेट बनवणाऱ्या टीमचा ती भाग आहे. कमर्शियल स्पेसफ्लाइट कंपनीत सिस्टीम इंजिनिअर असलेल्या संजलने मुंबई विद्यापीठातून यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी घेतली आहे. मिशिगन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी ती २०११ मध्ये अमेरिकेत गेली होती.महानगरपालिका कर्मचार्‍यांची मुलगी संजलने आपल्या पदव्युत्तर पदवीसाठी एरोस्पेस विषय घेतला आणि प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण केली. कल्याणमधील कोळसेवाडी भागात राहणारे अशोक गावंडे म्हणतात की, संजलला नेहमीच स्पेसशिप बनवायचे होते. यामुळे तिने मास्टर डिग्रीमध्ये विषय म्हणून एरोस्पेसची निवड केली. ती सिएटलमधील ब्लू ओरिजिन येथे सिस्टीम इंजिनीअर म्हणून कार्यरत आहे.