दोन्ही महायुद्धांपेक्षा अधिक बळी कोरोनाने घेतले, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची कोरोना लसीबाबत महत्त्वाची घोषणा

अमेरिकेत कोरोनाचे जितके बळी गेले तितके कुठल्या महायुद्धातही गेले नाहीत, असं सांगत बायडेन यांनी शोक व्यक्त केलाय. पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, व्हिएतनाम युद्ध, ९/११ चा हल्ला या सर्वात मिळून जितक्या जणांनी आपले प्राण गमावले त्यापेक्षाही अधिक जणांनी कोरोना महामारीमुळे आपले प्राण गमावल्याचं जो बायडेन यांनी म्हटलंय. 

    कोरोना विषाणूने जगभर धुमाकूळ घातलाय. गेल्या वर्षभरात जगातील अनेक देशांतील नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. याचा सर्वाधिक फटका बसला अमेरिकेला. कोरोना संकटाने घेतलेल्या बळींच्या संख्येचा आकडा असलेलं कार्ड आपण सतत खिशात घेऊन फिरतो, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटलंय.

    अमेरिकेत कोरोनाचे जितके बळी गेले तितके कुठल्या महायुद्धातही गेले नाहीत, असं सांगत बायडेन यांनी शोक व्यक्त केलाय. पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, व्हिएतनाम युद्ध, ९/११ चा हल्ला या सर्वात मिळून जितक्या जणांनी आपले प्राण गमावले त्यापेक्षाही अधिक जणांनी कोरोना महामारीमुळे आपले प्राण गमावल्याचं जो बायडेन यांनी म्हटलंय.

    अमेरिकेत लसीकरणाची मोहिम वेगाने सुरू असून अधिकाधिक नागरिकांपर्यंत लस पोहोचवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. लवकरच म्हणजे १ मे पर्यंत सर्व प्रौढ अमेरिकी नागरिकांसाठी लस उपलब्ध होईल, अशी घोषणा जो बायडेन यांनी केलीय. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर्स यांच्यासाठी अमेरिकत लसीकरण मोहिम राबवण्यात आली. त्यानंतर आता ज्येष्ठ नागरिकांसाठी मोहिम राबवण्यात येत आहे. लवकरच ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण पूर्ण होईल आणि सर्व प्रौढ अमेरिकन नागरिकांसाठी लसीकरणाला सुरुवात होणार आहे.

    वेगाने लसीकरण मोहिम राबवण्याच्या बाबतीत अमेरिकेखालोखाल भारताचा नंबर लागतो. भारतात सध्या ६० वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण सुरू आहे. त्याचप्रमाणे ४५ वर्षांवरील गंभीर आजार असणाऱ्यांना लस देण्यात येत आहे. साधारण महिन्याभरात भारतातदेखील सर्वांसाठी लस उपलब्ध होईल, असं सांगितलं जातंय.