Pregnant women without SEX cycle; The doctor found the answer in the medical checkup

कोरोनाच्या संसर्गाशी झुंजत असलेल्या ब्राझीलमधील गरोदर महिलांसाठी हा महासाथीचा आजार काळ ठरला आहे. ब्राझीलमध्ये गरोदर आणि प्रसूती झाल्यानंतर जवळपास ८०० महिलांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे.

    ब्राझिलिया : कोरोनाच्या संसर्गाशी झुंजत असलेल्या ब्राझीलमधील गरोदर महिलांसाठी हा महासाथीचा आजार काळ ठरला आहे. ब्राझीलमध्ये गरोदर आणि प्रसूती झाल्यानंतर जवळपास ८०० महिलांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे.

    देशातील अधिकाऱ्यांनी कुटुंब नियोजन करण्याचे आवाहन केले असून करोना काळात महिलांनी गरोदर होण्याचे टाळावे, असे आवाहन केले आहे. ब्राझीलच्या एका टास्कफोर्सनुसार, गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यापासून ब्राझीलमध्ये कोरोना महासाथीचे थैमान सुरू झाल्यानंतर आतापर्यंत कमीत कमी ८०३ गरोदर असताना अथवा प्रसूती झाल्यानंतर मृत्यू झाला आहे. यातील ४३२ महिलांचा मृत्यू याचवर्षी झाला.

    ब्राझीलमध्ये यावर्षी कोरोनाचा आजार धोकादायक स्तरावर पोहचला आहे. जगभरात कोरोनाच्या संसर्गाचे थैमान सुरू असताना दुसरीकडे गरोदर महिलांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. इतर देशांच्या तुलनेने ब्राझीलमधील परिस्थिती आणखी घातक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. संपूर्ण जगात कोरोनामुळे झालेल्या गरोदर महिलांच्या मृत्यूंपैकी एकूण ७७ टक्के प्रकरणे ही ब्राझीलमधील आहेत.