चीनमधून येतेय ‘कोरोना धूळ’ ; किम जोंग उनचा आरोप

प्याँगयांग : कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतले असताना उत्तर कोरियाने मात्र, त्यांच्या देशात एकही कोरोना रुग्ण नसल्याचा दावा केला होता. मात्र, सध्या उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांना भलतीच भीती सतावत असल्याचे दिसून येत आहे.

प्याँगयांग : कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतले असताना उत्तर कोरियाने मात्र, त्यांच्या देशात एकही कोरोना रुग्ण नसल्याचा दावा केला होता. मात्र, सध्या उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांना भलतीच भीती सतावत असल्याचे दिसून येत आहे. चीनमधून कोरोना धूळ येत असून या धुळीतून प्राणघातक वायू उत्तर कोरियात येत असल्याचा दाव करण्यात आला आहे. एवढेच नाही तर ही धूळ प्राणघातक विषाणू आणू शकेल, अशी भीती उत्तर कोरियाने व्यक्त केली आहे. या भीतीमुळे उत्तर कोरियाने आपल्या लोकांना घरात राहण्यास सांगितले आहे.

उत्तर कोरियाच्या राज्य माध्यमांनी २२ ऑक्टोबरपासून देशभरात पिवळ्या रंगाची धूळ येण्याचा इशारा देत विशेष हवामान झोनविषयी माहिती प्रसारित केली. प्याँगयांगमधील रशियन दूतावासाने एका फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, डीपीआरकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने मुत्सद्दी मिशन व इतर आंतरराष्ट्रीय संस्थांना दिवसभर खिडक्या उघडण्यास टाळा, असा सल्ला दिला आहे. दूतावासाने लिहिले, हे उपाय, जसे आम्हाला सांगितले गेले होते की कोव्हिड-19 या पिवळ्या धुळीच्या कणांतून उत्तर कोरियामध्ये प्रवेश करू शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या इशाऱ्यानंतर प्योंगयांगमध्ये गुरुवारी एकही नागरिक रस्त्यावर दिसला नाही. त्यादिवशी पाऊस न पडताही लोकांनी रेनकोट घातले होते.