न्यूझीलंडमध्ये १०२ दिवसानंतर कोरोनाचा शिरकाव, लॉकडाऊन जाहीर

न्यूझीलंडने गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनावर पूर्ण नियंत्रण मिळवले होते. न्यूझीलंड कोरोनामुक्त झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले होते. मात्रा आता १०२ दिवसांनंतर न्यूझीलंडमध्ये कोरोना रुग्ण सापडले आहेत. ही माहिती मिळताच प्रशासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, न्यूझीलंडमध्ये ऑकलंड भागात एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. या चौघांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. ऑकलंडमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तसेच देशातील इतर भागांमध्ये लेव्हल -२ लॉकडाऊन आहे.

नुकतेच न्यूझीलंडमध्ये एकही कोरोनाबाधित रूग्ण न सापडून १०० दिवस पूर्ण झाले होते. मात्र आता १०२ दिवसांनंतर न्यूझीलंडमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असल्याचे दिसून आले आहे.