कोरोनाचा धोका वाढला... | अमेरिकेत कोरोनाचा स्फोट, एकाच दिवसात १ लाखांपेक्षा जास्त रुग्ण, जगाचं टेन्शन वाढलं | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
विदेश
Published: Jul 29, 2021 08:00 AM

कोरोनाचा धोका वाढला...अमेरिकेत कोरोनाचा स्फोट, एकाच दिवसात १ लाखांपेक्षा जास्त रुग्ण, जगाचं टेन्शन वाढलं

Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
अमेरिकेत कोरोनाचा स्फोट, एकाच दिवसात १ लाखांपेक्षा जास्त रुग्ण, जगाचं टेन्शन वाढलं

अमेरिकेत कोरोनाचा धोका वाढला असून ही संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेत दोन डोस घेतलेल्यांनी मास्क लावण्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलं होतं. मात्र आता पुन्हा नियमांमध्ये बदल केले जात आहेत. अमेरिकेत सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे.

    वॉशिंग्टन –  कोरोना विषाणूने पुन्हा एकदा अमेरिकेत हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. अमेरिकेत मागील २४ तासांत १ लाखांहून अधिक कोरोना रूग्ण सापडले आहेत. तर बरे होण्याचे प्रमाण पाहिले असता, रूग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. अमेरिकेत सध्या १ लाख ६ हजार ८४ इतके नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात नव्या रुग्णांची संख्या ७३ टक्क्यांनी वाढली आहे.

    अमेरिकेत दोन डोस घेतलेल्यांनी मास्क लावण्याची आवश्यकता

    अमेरिकेत कोरोनाचा धोका वाढला असून ही संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेत दोन डोस घेतलेल्यांनी मास्क लावण्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलं होतं. मात्र आता पुन्हा नियमांमध्ये बदल केले जात आहेत. अमेरिकेत सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे.

    कोरोनाचा नवा डेल्टा व्हेरिएंट हा लस घेतलेल्यांमध्येही आढळत आहे. हा नवा व्हेरिएंट वेगाने पसरत आहे. त्यामुळे मास्क बंधनकारक करण्यात येत आहे. हा व्हायरस अधिक संसर्गजन्य आणि धोकादायक असल्याचं म्हटलं जात आहे.

    नव्या डेल्टा व्हेरिएंटपासून सतर्कता बाळगण्याचं आवाहन

    अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनीही नव्या डेल्टा व्हेरिएंटपासून सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं आहे. भलेही लसीकरणामुळे मृतांची संख्या कमी असली, तरी लस घेतलेल्यांनाही लागण होत असल्याने चिंता वाढली आहे. दुसरीकडे लस न घेणाऱ्यांना वेगाने संसर्ग होत आहे. त्यामुळे असे रुग्ण तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागत आहेत.

    दरम्यान, भारतात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास १४ हजारांनी वाढ झाली आहे.

    Comments
    Advertisement
    Advertisement
    दिनदर्शिका
    २२ बुधवार
    बुधवार, सप्टेंबर २२, २०२१

    पंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का?

    View Results

    Loading ... Loading ...
    Advertisement
    Advertisement
    OK

    We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.