चीनमध्ये पुन्हा वाढला कोरोना ; फुजियान प्रांतात डेल्टा व्हेरिएंटचा कहरामुळे शहर सील

फुजियान प्रांतात १० ते १२ सप्टेंबरमध्ये कोरोनाचे ४३ रुग्ण आढळले आहेत. त्यातील ३५ रुग्ण पुतियान शहरातील आहेत. तसेच लक्षणे नसलेले ३२ संशयित रुग्णही आढळले आहेत. १२ सप्टेंबरपर्यंत चीनमध्ये एकूण ९५,२४८ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

    चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढलेला आहे. चीनच्या फुजियान प्रांतात डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण वाढल्याने हे शहरच सिल करण्यात आले आहे. या व्हेरिएंटचे येथे संक्रमण झपाट्याने पसरत आहे.शहरातील सनिमाघर, जिम आणि महामार्ग बंद करण्यात आले आहे. तसेच नागरिकांना शहराबाहेर जाऊ नये,असे सांगण्यात आले आहे. येथील ऑफलाईन शाळाही बंद केल्या आहेत.

    फुजियान प्रांतात १० ते १२ सप्टेंबरमध्ये कोरोनाचे ४३ रुग्ण आढळले आहेत. त्यातील ३५ रुग्ण पुतियान शहरातील आहेत. तसेच लक्षणे नसलेले ३२ संशयित रुग्णही आढळले आहेत. १२ सप्टेंबरपर्यंत चीनमध्ये एकूण ९५,२४८ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यातील ४,६३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.पुतियानमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा प्रकोप झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. कोरोनाचा प्रकोप इतर प्रांतात पसरू नये, यासाठी आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे.